Dhananjay Munde Vs Karuna Sharma : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि परळीचे आमदारह धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी होत आहे. करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या (Karuna Sharma) अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. तर पोटगीची रक्कम तुटपुंजी असून ती 9 लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. आता याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली.
अधिकृत लग्न केलंच नाही
करुणा मुंडे यांना पोटगी मिळण्याप्रकरणी अंतिम युक्तीवाद सुरु आहे. आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. धनंजय मुंडेंनी मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा दावाही केला.
धनंजय मुंडे सहाच महिन्यांत आमदारकीचा राजीनामा देणार, करुणा मुंडेंच्या दाव्याने खळबळ
राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे. मात्र, मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत अधिकृत लग्न झालेले नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही. करुणा मुंडे यांना १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इन्कम आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात.
माझ्या पैशांची गरज नाही
करुणा मुंडे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे, असा युक्तीवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत. सातत्याने करुणा माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे. करुणा मुंडे या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, असेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.