धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; करूणा शर्मांनी सुप्रिया सुळेंसमोर मांडली कैफियत

Karuna Sharma Meet Supriaya Sule Dhananajay Munde Tension increase : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणात संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर कृषी विभागातील घोटाळ्याचा आरोप होत आहे. त्याबाबत आजच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania)यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील त्यांच्या मागे विविध गैरव्यवहारांच्या आरोपांचा ससेमिरा लावला आहे दुसरीकडे मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा शर्मा या यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.
Delhi New CM : मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री
त्यामुळे या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा पाया आणखी खोलात जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. करूणा शर्मा यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. या अगोदर शर्मा यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार केली होती. तसेच सुप्रिया सुळे यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानंतर आज अखेर ही भेट झाली आहे. यावेळी त्यांनी आपली बाजू मांडली. यामध्ये त्यांनी मुंडेंनी आपल्याला कशाप्रकारे त्रास दिला. तसेच त्यांची सध्या सुरू असलेली कायदेशीर लढाई याबाबतही त्यांनी सुळेंना माहिती दिली. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्राम शेअर केला आहे.
भाजपकडून निव्वळ ‘ध’ चा ‘मा’, मालवण शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी मोदी कधी माफी मागणार?, कॉंग्रेसचा सवाल…
तर आज बोलताना दमानिया म्हणाल्या की, काही पक्षाच्या प्रवक्त्यांना प्रश्न पडला आहे की, धनंजय मुंडे यांचा आणि संतोष धेशमुख यांच्या हत्येचा काय संबंध? हे सगळे मी ॲाफिस ॲाफ प्रॅफीट घोटाळे हे मुद्दे का घेत आहे? पण जर क्रम बघितला तर 4 तारखेला मी प्रेस घेतली. 6 तारखेला मी प्रोडक्ट मागवले. त्यावर 7 तारखेला बंदी घातली. यावर इफ्कोच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितले की, इफ्कोमध्ये किती घोटाळे होतात? तिथल्या सीईओपासून सगळे कसे भ्रष्टाचार करतात?
विल यंगचा पाकिस्तानला धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे पहिले शतक झळकावत केला खास क्लबमध्ये प्रवेश
त्यानंतर आज मी कृषी घोटाळा दाखवत आहे. या पत्रावर तारीख नाही. त्यात त्यांनी लिहिले आहे की, 23 आणि 30 तारखेच्या कॅबिनेट बैठकीत हे निर्णय झाले आहेत. मात्र त्या दोन्ही दिवसांच्या बैठकीत कृषी विभागाचा कुठलाही निर्णय झाला नाही. त्याचे देखील जीआर काढण्यात आले आहेत. हा मंत्री कुठल्या थराला जातो ते पाहा. खोटं बोलून धनंजय मुंडे हे मांडत आहे. हे जर इतके खोटे बोलत असतील. हा मंत्री मंत्रीमंडळात न झालेला निर्णय झाला म्हणून सांगतात. दोनशे कोटींचा हा घोटाळा आहे. असा आरोप यावेळी दमानिया यांनी करत पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.