विल यंगचा पाकिस्तानला धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे पहिले शतक झळकावत केला खास क्लबमध्ये प्रवेश

  • Written By: Published:
विल यंगचा पाकिस्तानला धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे पहिले शतक झळकावत केला खास क्लबमध्ये प्रवेश

Champions Trophy 2025 : आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची (Champions Trophy 2025) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा (Pak vs NZ) सामना होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगने (Will Young) पाकिस्तानला धक्का देत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिले शतक झळकावले आहे. या सामन्यात 113 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या. या दरम्यान त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक आहे.

यंगने आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच शतक ठोकला आहे. विल्यमसनच्या खास क्लबमध्ये प्रवेश याच बरोबर त्याने दिग्गज फलंदाज केन विल्यमसनच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा तो न्यूझीलंडचा चौथा खेळाडू ठरला. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विल्यमसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 धावा केल्या. 2000 मध्ये झालेल्या स्पर्धेत माजी किवी खेळाडू ख्रिस केर्न्सने भारताविरुद्ध नाबाद 102  धावा केल्या होत्या. 2004 मध्ये न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू नॅथन अ‍ॅस्टलने अमेरिकेविरुद्ध नाबाद 145 धावा केल्या होत्या.

या सामन्यात टॉस गमावल्यानंतर फलंदाजीला आल्यानंतर न्यूझीलंड संघाने स्थिर सुरुवात केली. यंग आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. कॉनवेच्या बॅटमधून 17 चेंडूत फक्त 10 धावा आल्या. आठव्या षटकात अबरार अहमदने त्याला बाद केले. विल्यमसन देखील फक्त एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर यंग आणि टॉम लॅथमने चौथ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. या दरम्यान त्याने आपले शतक पूर्ण केले.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारे किवी खेळाडू

145 * – नॅथन अ‍ॅस्टल विरुद्ध अमेरिका, द ओव्हल, 2004

102* – ख्रिस केर्न्स विरुद्ध भारत, नैरोबी, 2000 अंतिम सामना

100- केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एजबॅस्टन, 2017

100* – विल यंग विरुद्ध पाकिस्तान, कराची, 2025

मोठी बातमी! मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये 3 कुख्यात महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube