Download App

नाशिकची ‘रावळगाव शुगर्स’ रिलायन्सच्या मालकीची : अंबानी बनवणार बच्चे कंपनींचे फेवरेट चॉकलेट्स

नाशिक : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स उद्योग समुह (Reliance Industries Group) आता पान पासंद चॉकलेट, चोको क्रीम आणि कॉफी ब्रेक टॉफीचीही विक्री करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने (Reliance Consumer Products) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘रावळगाव शुगर कंपनी’ (Rawalgaon Sugar Company) खरेदी केली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टस आणि रावळगाव शुगर कंपनी यांच्यात 27 कोटींमध्ये याबाबतचा करार पार पडला. त्यामुळे रावळगाव शुगर फार्मचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदेचे अधिकार रिलायन्सकडे आले आहेत. (Reliance Consumer Products has acquired ‘Rawalgaon Sugar Company’)

अशी झाली होती ‘रावळगाव शुगर कंपनी’ची स्थापना :

उद्योजक वालचंद हिरानंद यांचे वडील मुळचे सोलापूरचे होते. सोलापूरमध्ये त्यांचा मोठा अडत व्यापार होता. पण वालचंद यांना वडिलांच्या या उद्योगात रस नव्हता. त्यांनी सोलापूरमध्येच रेल्वेचे कंत्राट घेण्याचे काम सुरु केले. बार्शी लाईट रेल्वेलाईनचे काम त्यांनी केले. साधारण 1920 च्या दशकात त्यांना नाशिक जिल्ह्यातील ‘रावळगाव’ येथे जवळपास दीड हजार एकर जमीन स्वस्तात मिळाली होती. शेजारहूनच वाहणाऱ्या गिरणा कालव्याच्या पाण्यावर इथे मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली.

माझे ठाम मत, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय… : फडणवीसांची जहरी टीका

याच उसाच्या लावडीतून हिरानंद यांनी 1933 ‘रावळगाव शुगर फार्म लि.’ची स्थापना केली. याच साखरेच्या उत्पन्नातून 1942 मध्ये या कंपनीने ‘रावळगाव’ हे चॉकलेट तयार करण्यास सुरुवात केली. रावळगाव हा भारतातील पहिला स्वदेशी ब्रँड बनला. अल्पावधीमध्ये हे चॉकलेट बच्चे कंपनीच्या पसंतीत उतरले. त्यानंतर बाजारात आणलेल्या पान पसंद या चॉकलेटनेही लहानांपासून थोरांना वेड लावले. अनेक पिढ्यांचा बालपणाचा काळ रावळगाव शुगर कंपनीने सुखी केला. आताही या कंपनीचे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टूटी फ्रुटी, पान पसंद, चोको क्रीम आणि सुप्रीम यासारखे हे सुप्रसिद्ध ब्रँड बाजारात आहेत.

मॉरीसचा बॉडीगार्ड म्हणतो, मला फसवलंय; अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी!

मात्र वेळेप्रमाणे लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि त्याप्रमाणे कंपनीने बदल केला नाही. त्यामुळे चॉकलेट्सनी मान टाकली याशिवाय आर्थिक उदारीकरणानंतर बाजारात अनेक कंपन्यांचा प्रवेश झाला. त्यातून स्पर्धा वाढली, याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला. यामुळे मागील काही काळापासून ही कंपनी आर्थिक समस्येशी सामना करत आहे. मात्र आता हा ब्रँड पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने बाजारात आणण्यासाठी कंपनीने अंबानी यांच्यासोबत व्यवहार केला असून लोकांच्या जीभेवरचा गोडवा परत आणण्यासाठी ‘रावळगाव शुगर कंपनी’ पुन्हा सज्ज झाली आहे.

follow us

वेब स्टोरीज