Download App

मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; मुलाच्या लग्नाचं दिलं आमंत्रण

रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

 Mukesh Ambani Met CM Eknath Shinde : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Eknath Shinde) त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 12 जुलै रोजी होणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक मुकेश अंबानी यांच स्वागत केलं. (Mukesh Ambani) यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. हा विवाह सोहळा १२ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रतिष्ठित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.

12 जुलै 2024 रोजी विवाह वाद वाढला! राजनाथ सिंहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर; म्हणाले, मी खर्गेंबरोबर..

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह राधिका मर्चंटसोबत 12 जुलै 2024 रोजी होत आहे. जामनगरमध्ये त्यांचं प्री-वेडिंग फंक्शन्स झालं आहे. राधिका मर्चंट अंबानी कुटुंबाची सून होत आहे. अनंत आणि राधिकाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आता दोघांचं 12 जुलै लग्न होत आहे.

विधी पद्धतीने विवाह

पंडित जगन्नाथ गुरुजींच्या मते, विशिष्ट मुहूर्त, नक्षत्र आणि तारखेसह 12 जुलै 2024 ची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक, धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय पद्धतीने हा विवाह होत आहे. आजीवन प्रेम, समृद्धी आणि परस्पर वाढीची जपमाळ सर्वात शुभ आहे. या दोघांचा वैवाहिक प्रवास सुरू करण्याच्या दृष्टीने हे वचनबद्धतेचे प्रतीक आहे असंही पंडित जगन्नाथ यांनी सांगितलं आहे.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रम मोठी बातमी : लोकसभेत आता घमासान ! Rahul Gandhi यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

12 जुलैपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. पहिला सोहळा शुभ विवाह म्हणजेच विवाह सोहळा असेल.  13 जुलै हा शुभ आशीर्वादाचा दिवस असणार आहे. 14 जुलै रोजी मंगल उत्सव विवाह रिसेप्शन असणार आहे. हे सर्व कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केले गेले आहेत. या सोहळ्याला सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींशिसह अनेक राजकारणी आणि व्यावसायिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज