Download App

सर्वसामान्यांना दिलासा, खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण

मुंबई : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या (Edible Oil)किंमतीत मागील तीन वर्षांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (Corona)काळानंतर मागील तीन वर्षांपेक्षा सर्वात कमी स्तरावर पोहोचल्यामुळं सध्या गृहिणींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. थंडीच्या (Winter Season)दिवसांमध्ये काही प्रमाणात तेलाचे दर कमी होतात, मात्र यंदा या दरानं निच्चांकी पातळी गाठल्याचं पाहायला मिळतंय.

यंदा हे खाद्यतेलांचे दर निच्चांकी पातळीवर येण्याचं एक कारण म्हणजे तेलबियांची झालेली आवक हे आहे. सध्याचं वातावरण (Climate)हे अशा पिकाला पोषक असं राहिल्यानं ही आवक चांगली झाल्याचं एका तेल व्यापाऱ्यानं सांगितलंय.

Health Tips : ही हिरवी चटणी कोलेस्ट्रॉलपासून देईल मुक्ती … अशा प्रकारे सेवन करा

कोरोनाच्यानंतर रशिया (Russia)आणि युक्रेन (ukraine)या दोन देशांत युद्ध सुरू झालं. त्याचा थेट परिणाम झाला. तेलांचे दर वाढतच गेले. पुढे काही काळात तेलाचे दर भरपूर वाढले. बाजारपेठेत सध्या सरकी, सूर्यफूल, पामतेल या तेलांना मागणी वाढलीय. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत 30 ते 40 टक्के दर घसरलेत. तर 2022 च्या दिवाळी सणाच्या तुलनेत विचार करता हे दर साधारणपणे 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे एका तेल व्याराऱ्यानं सांगितलंय.

आता साधारणपणे सरकी तेल- 130 ते 140 रुपये, शेंगदाणा तेल -170 ते 190 रुपये, सूर्यफूल तेल -160 ते 165 रुपये, पामतेल 100 ते 110 रुपये, खोबरेतेल – 200 ते 240 रुपये असे दर पाहायला मिळताहेत. हे दर गत दोन-तीन वर्षांत इतके कमी झाल्याचं एका तेल व्यापाऱ्यानं सांगितलंय.

Tags

follow us