Download App

परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

परिवहन विभागाच्या जमीनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

Minister Pratap Sainaik : राज्यातील परिवहन विभागाच्या जमीनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयात आज परिवहन विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंत्री सरनाईक उपस्थित होते.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी गारपिटीचा तडाखा; शेती पिकांसह फळ बागांचंही मोठं नुकसान

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यभरात ठिक ठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे. त्या जमिनीवर कित्येक वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करुन आपल्या ताब्यात घ्याव्यात. तेथे कुंपण भिंत करावी .तसेच आपल्या विभागाचा नामफलक प्रदर्शित करावा व यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सरनाईकांनी दिले आहेत.

तसेच या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदाची निर्मिती करणे,वायु वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणे, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामा सह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधि व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

वफ्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत संजय राऊतांची जोरदार बॅटींग मात्र शरद पवारांची अनुपस्थिती

परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवा
सन 2023 पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही. यापुढे देखील या ॲपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणाऱ्या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष रहावे. तसेच अधिकाऱ्यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या देखील बदल्या या ॲपद्वारे होतील असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले ‌.

follow us