Download App

Maratha Reservation : ‘आरक्षण दिलं पण, रद्द झालं, सरकारने आयोगाचा अहवाल..,’; संभाजीराजेंनी सगळचं बाहेर काढलं

Sambhajiraje Chatrapati : तत्कालीन सरकारने आरक्षण दिलं होतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं, सरकारने गायकवाड समितीचा अहवाल हवा तसा सादर न केल्यानेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याने अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे.

आईला पाहून जरांगेंना अश्रू अनावर… म्हणाले, ‘हत्तीचं बळं आलं, आता आरक्षणासाठी एकही मुडदा पडू देणार नाही’

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात एकूण 58 मोर्चे निघाले होते, या मोर्चाची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. फडणवीस सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला होता, मात्र न्यायालयात आरक्षण रद्द करण्यात आलं होतं, सरकारनेही दुर्लक्ष केलं, गायकवाड समितीचा अहवाल म्हणावा तसा सादर केला नसल्यानेच आरक्षण रद्द करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Happy Birthday Asha Bhosale : …म्हणून खय्याम यांनी आशाताईंकडून सरस्वतीची शपथ वदवली

तसेच मागासवर्ग आयोगाबाबत पुर्नगठन करणं गरजेचं आहे, त्यानंतरच मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करुन आरक्षण द्यायचं की नाही? हे ठरवावं, केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही सत्तेत नसतानाही हेच बोलत होतात, आत्ताही हेच बोलत आहात? आता तुम्ही सरकारमध्ये आहेत तुम्ही ठरवा आरक्षण द्या, तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही हे सगळं करु शकता, नसेल जमत तर आम्ही ते करु शकतो, असा इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस गप्प का?

राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने आतापर्यंत काय केले हे सांगाव? सरकार लोकांच्या भावनांशी खेळतय असून मराठा समाजाला अध्यादेश काढून दिलेले आरक्षण टिकणार नाही, सरकारमधे अनेक जाणकार लोक आहेत. त्यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा ही पुन्हा मराठा समाजाची फसवणूक ठरेल, शाहू महाराजांनी जी भूमिका घेतली ती महत्वाची, संपुर्ण बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे, माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणबाबत दोन टक्के अधिक माहिती आहे. मग गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का बसलात? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला आहे.

Maratha Reservation : अध्यादेश निघाला पण बीडमध्ये आरक्षणाची धग कायम; एसटी बसच जाळली

दीड-दोन वर्षापासून मी बोलतोयं, त्याची दखल एकदाही सरकारने घेतली नाही, आत्ता सरकार लोकांना फसवत आहे, लोकांना फसवणं बंद करा, सरकारने जी समिती नेमली काय केलं तिने? समितीच्या किती बैठका झाल्या? बैठकीत काय चर्चा झाली? त्यांनी बैठकांचं रेकार्डिंग द्यावं? सामाजिक मागास आयोगावर कोणीच का बोलत नाही? तुम्ही सामाजिक मागास असल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, हे आरक्षणाचं सोपं गणित असल्याचं म्हणत संभाजीराजेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=edyO3n2dG40

गायकवाड समितीचा अहवाल :
मी एकमेव लोकप्रतिनिधी आहे, जो मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात हजर राहत होतो. मराठा आरक्षणाचं मी आंदोलन केलं. गायकवाड समितीचा अहवाल परफेक्ट आहे, पण जसा सादर व्हायला हवा तसा झाला नाही, सुनावणीत अहवाल नीट सादर करता आला नाही, त्यामुळे आरक्षण रद्द झालं असल्याचं ते म्हणाले आहेत.

follow us