Download App

तामिळनाडूमध्ये आरक्षण मग महाराष्ट्रातही… मोदी शाहंकडे इशारा करत पवारांनी सांगितला तोडगा

Sharad Pawar यांनी आज 30 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरक्षणावर भाष्य केले आहे.

Sharad Pawar on Maratha Reservation at Ahilyamnagar : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरक्षणावर भाष्य केले आहे.

अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने दिलेल्या निर्णयाचा ट्रम्प टॅरिफवर काय परिणाम होईल?

काय म्हणाले शरद पवार?

आज 30 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगरमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरूण कडू यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुर्वी गांधींचा विचार होता. मात्र आता अलिकडच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा विचार वाढतोय. याचा परिणाम काय होत आहे? या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण सध्या सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे.

सोनू सूद करणार स्टार प्लसच्या ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च! शोची खासियत

राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण हा प्रश्न महाराष्ट्राला नवा नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या हातात सत्ता असताना त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याची भूमिका मांडली आणि 50 टक्के आरक्षण दिलं. त्यांचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा.आज आरक्षणावरून वाद सुरु आहे. यामुळे समाजसमाजामध्ये कटुता येते.

जरांगेंनी नाक दाबताच BMC आयु्क्त लागले कामाला; फोटो टाकत दिली सुविधांची माहिती

ओबीसीमध्ये अनेक अडचणी आहे. आरक्षणाच्या वादातून कटुता येणार नाही. हे महत्त्वाचे आरक्षण देताना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नको सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे. मात्र तामिळनाडूमध्ये ही सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यांनी 72 टक्के आरक्षण दिले गेलेले आहे. ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेले देखील आहे. आरक्षणाबाबत संसदेमधील सहकाऱ्यांशी चर्चा करतोय. जर तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण दिलं जात असेल तर आरक्षणासाठी घटना दुरुस्त करण्याची वेळ आली तरी यावर चर्चा झाली पाहिजे. तर घटनेमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली पाहिजे तर काहीन काही बदल झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र केंद्राची भूमिका यामध्ये स्पष्ट असावी. असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

follow us