Download App

TATA: टाटा ग्रुपचा ऐतिहासिक निर्णय! कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण, वंचित घटकांना मिळणार न्याय

टाटा ग्रुपने एक एतिहासीक निर्णय घेतला आहे. टाटा स्टील कंपनीमध्ये काही समूदायांना नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Reservation in Tata Group : टाटा ग्रुप आता आणखी एका ऐतिहासिक निर्णयामुळे चर्चेत आला आहे. तसा हा ग्रुप हजारो कोटींच्या दातृत्वामुळं कायम चर्चेत असतो. रतन टाटा हे कायम देशासमोर आदर्श निर्माण करत असतात. (TATA Group) त्याचे असंख्य उदाहरण समोर आहेत. आता त्यांच्या टाटा (TATA ) ग्रुपने असा एक मोठा निर्णय घेतला असून त्यांच्या कंपनीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्या आला आहे.

२५ टक्के आरक्षण  Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक

जदशेदपूर इथल्या टाटा स्टील कंपनीमध्ये काही समूदायांना नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये अपंग, वंचित आणि (LGBTQ+)समूदायातील व्यक्तींना टाटा स्टील प्राधान्यक्रमाने नोकरी देणार आहे. टाटा स्टीलने अशा ठाराविक लोकांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाविन्यपूर्णतेला बळ मिळेल

टाटा स्टीलमधील वरिष्ठ अधिकारी जयसिंग पांडा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येकाला समान अधिकार मिळवून देणं ही एक जबाबदारी आहे. विविधता ही आपली ताकद आहे. यामुळे कामातील नाविन्यपूर्णतेला बळ मिळेल असंही ते यावेळी म्हणाले आहेत. कंपनीने यापूर्वीच ट्रान्सजेंडरसाठी सवलत दिलेली होती. त्यासह आता वंचित आणि अपंगांसाठीही कंपनीने एक पाऊल पुढं टाकलं आहे. टाटांच्या जमशेदपूर येथील प्लांटमध्ये तृतीयपंथियांसाठी सर्व सोयी-सुविधा आहेत. स्वतंत्र स्वच्छतागृहेदेखील आहेत.

टाटा ग्रुप सर्वत्र कौतूक गावस्कर, सचिनला जे जमलं नाही ते रोहित शर्माने करून दाखवलं, खास विक्रमांवर कोरलं नाव

जगभरातील (LGBTQIA+) समुदाय जून महिना ‘प्राइड मंथ’ म्हणून साजरा करतात. भारतातील कॉर्पोरेट जग केवळ (LGBTQIA+) समुदायातील लोकांना नोकऱ्या देत नाही तर त्याऐवजी या समुदायातील लोकांना प्रशिक्षण देऊन (LGBTQIA+) टॅलेंट तयार करत आहे. टाटा कंपनीने एक या माध्यमातून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, टाटा ग्रुपच्या या निर्णयामुळे सर्वत्र त्यांचं कौतूक होत आहे.

follow us

वेब स्टोरीज