Download App

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर

  • Written By: Last Updated:

नागपूर : कोकणातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या वर्षीच सप्टेंबरमध्ये चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

यानंतर हा प्रस्ताव विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती.

बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले.

कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य लक्षात घेवून चिपी परुळे येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

Tags

follow us