Download App

महसूल मंत्री विखे पाटलांनी आज कोणालाचं नाही सोडलं…

अहमदनगर : महाविकास आघाडीत भविष्यकारच जास्त झाले आहेत, असल्याची खरमरीत टीका भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. संगमनेरमधील नियोजित कार्यक्रमात विखे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विखे पाटलांनी यावेळी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे.

तसेच सध्यातरी आता विरोधकांकडे दुसरा कोणता विषय राहिल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे जे विरोधत आरोप करीत आहेत, ते आरोपच करत राहणार असल्याचंही खोचक विधान त्यांनी यावेळी केलं आहे.

Prashant Jagtap राज ठाकरेंना असे का म्हणाले… साहेब किती दिवस दुसऱ्याच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? मनसेचेही सडेतोड उत्तर…

राज्यात भाजप-शिंदे सरकारवर सातत्याने विरोधकांकडून धारेवर धरण्यात येतंय. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमुळे आमचा काम करण्याच आत्मविश्वास आणखी वाढत जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

बाळासाहेब थोरात-नाना पटोले एकाच व्यासपीठावर; चहाच्या पेल्यातील वादळ शमलं ?

काँग्रेसच्या भविष्यावर मोठं विधान…
काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरु आहे ते त्यांच्या अंतर्गत गटबाजीवरुन सुरु आहे. तो त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे, तो त्यांनी सोडवावा. काँग्रेस नेत्यांच काय ते मला माहीत नाही पण आगामी काळात काँग्रेसचं भविष्य संपलेलं असणार आहे.

“Uddhav Thackeray यांच्यामुळेच मविआ सरकार पडले” हा पक्षांतर्गत वाद, शिंदे गटाचा कोर्टात दावा

ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सत्तासंघर्षाच्या सुनावणीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असून त्यावरही विखे पाटलांनी भाष्य केलं आहे. विखे पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात आमची सत्याची बाजू असून आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सत्यजित तांबेबद्दल विखे म्हणाले..,
विधानपरिषद निवडणुकीत ज्यांना उभं राहायचं होतं ते उभे राहिले नाहीत. ज्यांना घरात बसायचं होतं ते घरात बसले आहेत. कोणाला हात टाकून बसायचं होतं ते हात टाकून बसले आहेत. महाराष्ट्रात काय तेवढा एकच विषय नसून इतरही विषय आहेत.

दरम्यान, 14 फेब्रुवारीला राज्यातील असंविधानिक पडणार असल्याची भविष्यवाणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर काल सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर आज शिंदे गटाकडून हरिष साळवे यांचा युक्तीवाद सुरु आहे.

Tags

follow us