Tanaji Sawant : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती मात्र ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून ते व त्यांचे मित्र हे विमानाने कुठेतरी गेले आहे. त्याबाबत पोलिसांकडून शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज दुपारी 4 च्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत (Rishiraj Sawant) यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. ते पुण्यावरून फ्लॉईटमध्ये गेलेले आहे. ते विमान कोणत्या दिशेने गेले आहे याबाबत तपास सुरु आहे. तसेच सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, ते नक्की कुठे गेले, याची माहिती मिळालेली नाही. विमान लँड झाल्यावर त्याचा ठावठिकाणा समजू शकेल, त्यानंतर त्याला परत आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
तर आम्हाला ड्रायव्हरच्या माध्यमातून कळाले की, माझा मुलगा आणि त्याचे मित्र विमानाने कुठेतरी गेले आहेत. ड्रायव्हरने त्यांना पुणे विमानतळावर सोडले होते. आमचे रोज व्यवस्थित कम्युनिकेशन होत असते, मात्र आज बोलणे झाले नाही, त्यामुळे चिंता वाटत आहे. तो कुठेही जाताना आम्हाला कळवतो, पण आज तसे घडले नाही. सध्या तो कुठे आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. पोलीस तपास करत आहेत. पोलीस आणि आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत असं यावेळी तानाजी सावंत म्हणाले.
Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पथकाला तपास सोपवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, मुलगा सुखरूप परत आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. असेही तानाजी सावंत म्हणाले.