Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत (Road Accident) चालली आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी ट्रॅव्हल बस उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तब्बल 55 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.
Road Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला! भीषण अपघातात 6 जण जागीच ठार
पुण्याहून कोकणाकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आता समोर येत आहे. ताम्हिणी घाटात अवघड वळणे घेत असताना बस उलटली. या अपघातात दोघे जण ठार झाले तर 55 जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात ठार झालेल्या दोन्हीही महिला प्रवासी होत्या. अपघाताची माहिती मिळताच महाड, माणगाव येथून बचावपथके, रुग्णवाहिक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या. कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra | Two people died and 55 got injured after a travel bus overturned in the Tamhani Ghat area of Raigad under the Mangaon police station area at around 7.30 am today. The injured were taken to the nearest hospital for treatment: SP Raigad, Somnath Gharge pic.twitter.com/zyXvMS4vAf
— ANI (@ANI) December 30, 2023
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे.