Download App

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा होरपळून जागीच मृत्यू

Road Accident at Samrudhi Mahamarg : बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक जण गंभीर जखमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ या ठिकाणी हा अपघात झाला. कार रेलींगवर आदळली ही धडक इतकी जोरात होती की, या कारला आग लागली. ही कार नागपूरहून शिर्डीकडे जात होती.

IPL 2023 Final CSK vs GT : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाने फिरवले पाणी, राखीव दिवशी होणार सामना

अद्याप यातील मृत प्रवाशांची ओळख पटलेली नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर नागपूरपासून 305 किलोमीटवर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ या गावानजीक मध्यरात्री ही कार नागपूरहून शिर्डीकडे जात होती. त्यावेळी ती रेलींगला धडकली. त्यामुळे कारला भीषण आग लागली. या कारमध्ये तीन प्रवासी होते.

साक्षी मलिक, संगीता आणि विनेश फोगटची सुटका, बजरंग पुनिया अजूनही कोठडीत

यामध्ये दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तात्काळ मेहकर टोल प्लाझा आणि दुसरबीड टोल प्लाझा येथील कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी हा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. एका जखमीला रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

वांद्रे समुद्र सेतूला ‘स्वांतत्र्यवीर सावरकरांचं नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

दरम्यान नुकतच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचं 26 मे ला लोकापर्ण करण्यात आलं. त्यामुळे आता हा महामार्ग लोकांच्या सेवेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Tags

follow us

वेब स्टोरीज