IPL 2023 Final CSK vs GT : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाने फिरवले पाणी, राखीव दिवशी होणार सामना

  • Written By: Published:
IPL 2023 Final CSK vs GT : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाने फिरवले पाणी, राखीव दिवशी होणार सामना

IPL 2023 च्या अंतिम सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता, मात्र पावसामुळे रविवारी सामना सुरू होऊ शकला नाही. आता हा सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे रोजी खेळवला जाईल.

पावसामुळे रविवारी IPL 2023 चा अंतिम सामना खेळता आला नाही. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा अंतिम सामना आता सोमवारी होणार आहे. सोमवारचा दिवस अंतिम सामन्यासाठी राखीव आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार होता. मात्र पावसाने खेळ खराब केला. खेळाडूंसोबतच प्रेक्षकही बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. पण पाऊस थांबला नाही.

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात मिळालं स्थान

आता हा सामना सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. जर उद्या पण पावसाने सामना खराब केला तर सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत 5 – 5 षटकांचा सामना होईल. जर हे शक्य नाही झाले तर सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हरमध्ये देखील सामन्याचा निकाल आला नाहीतर गुजरात संघ चॅम्पियन होईल, कारण हा संघ 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल होता.

रविवारी चेन्नई-गुजरात अंतिम सामना पावसामुळे खेळला गेला नाही. याबाबत आयपीएलने ट्विट केले आहे. आयपीएलने ट्विटमध्ये लिहिले की, “आयपीएल 2023 चा फायनल उद्या, 29 मे ( राखीव दिवस) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.” आजची तिकिटे उद्यासाठीही वैध असतील. आम्ही तुम्हाला ते सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube