Download App

ते पक्षातील सर्वात अनुभवी नेते; काल टीका करणाऱ्या रोहित पवारांकडून जयंत पाटलांवर आज स्तुतीसुमनं

Rohit Pawar जयंत पाटील हे सर्वात अनुभवी नेते आहेत. असं म्हणत रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी जयंत पाटलांवर स्तुती सुमन उधळले आहेत.

Rohit Pawar Apriciat Jayant Patil after criticism : मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीकडे अनेक चेहरे आहेत. तसेच आमच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर जयंत पाटील ( Jayant Patil ) हे सर्वात अनुभवी नेते आहेत. असं म्हणत रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी जयंत पाटलांवर स्तुती सुमन उधळले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी याच रोहित पवारांनी जयंत पाटलांवर टीका देखील केली होती. मात्र आज त्यांनी जयंत पाटलांना अनुभवी नेते म्हटलं आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार?

दहा तारखेला राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन पार पडला. त्यावेळी शरद पवार गटाकडून हा वर्धापन दिन अहमदनगर शहरामध्ये साजरा करण्यात आला. याच वर्धापन दिनामध्ये रोहित पवार यांनी जयंत पाटलांवर टीका केली होती. रोहित पवार म्हणाले होते की, राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेला विराट यश हे पवार साहेब आणि स्वाभिमानी जनतेने टाकलेल्या विश्वासामुळे मिळालं आहे.

Raj Thackeray : मनसेमध्ये ठाकरेंचं ‘राज’! पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड

त्यामुळे कार्यकर्त्यांनी भारावून जाऊन त्याचं श्रेय कोणा एका नेत्याला देऊ नये. कारण धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तरी यशाला कोणी रोखू शकत नाही. असं म्हणत अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी जयंत पाटलांना टोला लगावला होता. तसेच यावेळी त्यांनी रावेरमध्य राष्ट्रवादीला यश न मिळाल्याने रोहिणी खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नसल्याचं म्हणत टीका केली होती.

आमदार अन् नेते सोडून जाण्याच्या भीतीने सुनेत्रा पवारांना खासदारकी; रोहित पवारांचा दावा

तसेच स्वतः जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने या आधी अनेकांनी मोजून झाले आहेत. आता पुढचे चार महिने मोजू नका. निवडणुका जवळ आल्यात जाहीरपणे बोलायचं बंद करा. काही तक्रार असेल तर शरद पवारांना सांगा. ते आमच्या दोन कानाखाली मारतील त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील.

दरम्यान रोहित पवारांच्या या अप्रत्यक्ष टीकेवर जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या. तसेच रोहित पवार यांच्या समर्थकांकडून संघटेनेत रोहित पवारांना मोठी जबाबदारी दिली जावी यासाठी पोस्ट करण्यात येत आहेत. रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्याकडे राज्याची मुख्य जाबाबदारी देण्याची मागणी केली जात आहे.

follow us