Jayant Patil : ‘मी निलेश लंकेंना तुतारी दिली, पुढील आवश्यक सोपस्कार योग्यवेळी पूर्ण करणार’
Jayant Patil On Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency)महाविकास आघाडीचा (MVA)उमेदवार अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यावर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कसलीही माहिती देण्यात आली नसल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आणि अहमदनगर लोकसभेच्या उमेदवारीबद्दल अद्यापही संभ्रम कायम आहे. असं असलं तरी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी आमदार निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. यावेळी मी निलेश लंकेंना तुतारी दिली, पुढील आवश्यक सोपस्कार योग्यवेळी पूर्ण करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
पवारांनी भाकरी फिरवली; धनुभाऊंचा खास माणूसच पंकजांचा पेपर अवघड करणार!
आमदार निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र शरद पवार आणि निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल आणि पक्षप्रवेशाबद्दल कोणतीही घोषणा केली नाही.
नाट्य परिषदेच्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न; मुंबईत होणार अंतिम सोहळा
आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक दिवसांपासून इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील निलेश लंके यांची समजूत काढली होती. पण त्यानंतरही निलेश लंके यांनी पवारांची भेट घेतली होती. असं असलं तरी आजपर्यंत आमदार निलेश लंके यांनी आत्तापर्यंत शरद पवार गटात जाण्याबद्दल किंवा लोकसभा उमेदवारीबद्दल कसलीही वाच्यता केली नाही. त्याचं कारणही तसंच आहे.
जर आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे आत्तापर्यंत आमदार लंके यांनी कसलीही घोषणा केली नाही. त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. पण आज निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
जयंत पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीबद्दल त्यांनी भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात आमदार निलेश लंके हे लोकप्रिय नेते आहेत. त्या ठिकाणी लंके हे लोकसभेसाठी उभे राहिले तर ते नक्की निवडून येतील. त्यांच्याबद्दल आम्ही सकारात्मक असून त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असावेत अशा भूमिकेचे आम्ही आहोत. पण त्याबद्दलचे आवश्यक सोपस्कार हे आम्ही योग्य वेळी पूर्ण करु. निलेश लंके यांच्या हातात आम्ही आमचं चिन्ह त्यांच्या हाती दिलेलं आहे. ती तुतारी त्यांनी हाती घेतलेली आहे. असं असतानाच दुसरीकडं त्यांनी सांगितलं की, आम्ही असं कोणतंही वक्तव्य करणार नाही की, ज्यामुळे आमदार निलेश लंके अडचणीत येतील.
आमदार निलेश लंके यांनी आमच्या पक्षाचं चिन्ह तुतारी ही स्विकारली की नाही? याबद्दल आपण कसलंही भाष्य करणार नाही. कारण तसं भाष्य केल्यास आमदार लंके हे अडचणीत येऊ शकतात. पण एवढं नक्की सांगतो की, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणूक जिंकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.