Rohit Pawar Vs Radhakrishna Vikhe Patil : मंत्रालयात कोणीही दलाल येऊ नये, मंत्रालयात लोकांच्या कामांसाठीच प्रवेश मिळावा म्हणून विशेष पास यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. (Vikhe Patil ) मात्र, त्यानंतर दोन दिवसांतच मंत्रालयात आलेल्या एका अलिशान गाडीची मंत्रालय व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर आमदार रोहित पवारांनी या अलिशान कारचा दाखला देत महायुती सरकारला लक्ष्यही केलं होतं.
लॅम्बोर्गिनी गाडीच्या काचा खाली घेतल्या असत्या तर; राधाकृष्ण विखेंचा रोहित पवारांवर पलटवार
आपण लवकरच या गाडीचा मालक कोण, आणि अलिशान कारमधून मंत्रालयात कोण आलं होतं, याची माहिती उघड करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता, रोहित पवार यांनी या कारबाबत माहिती दिली आहे. काळ्या काचा लावलेली एक अलिशान लम्बोर्गीनी कार मंत्रालयात दुपारी 3 वाजता पोहोचली आणि मंत्रालयात आलेल्या सर्वांचंच लक्ष तिकडे गेलं. सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तासनतास प्रतिक्षा करावी लागते. मात्र, या अलिशान लम्बोर्गीनीला गेटवर ना कुणी अडवलं, ना चेंकिंग झाली. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या लम्बोर्गीनीकडे गेल्या. आता, या लम्बोर्गिनीच्या मालकाचं नाव रोहित पवार यांनी उघड केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की, लॅम्बोर्गिनी गाडी माझ्याकडे आली, अशी चर्चा झाली. माझ्या आजपर्यंतच्या जीवनात असं कधी झालं नाही. मंत्रालयात अनेक गाड्या येत असतात. ही गाडी माझ्याकडे आली हे कसे? आधी चौकशी करायला हवी होती, असं त्यांनी म्हटलं आहे. तर काळ्या काचा होत्या, असं म्हणत होते. काचा खाली करून बघायला पाहिजे होते, कदाचित रोहित पवार त्यात दिसले असतं, असा पलटवार त्यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय. त्यावर आता रोहित पवार यावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
मंत्रालयातील महागड्या काळ्या गाडी प्रकरणात कुमार मोरदानीचे नाव मी घेतले, मंत्री माननीय विखे पाटील साहेबांचे नाव कुठेही घेतले नाही किंवा त्यांच्याकडे सूचक इशारा देखील केला नाही, तरीही त्यावर विखे पाटील साहेब प्रतिक्रिया देत असतील तर हे समीकरण न समजणारे आहे. आता गाडी कुणामुळे आली? कशासाठी आली? कुणाच्या सांगण्यावरून कोणाकडे आली? हेही सांगून विखे पाटील साहेबांनीच हे कन्फ्युजन दूर करावे, ही विनंती असं रोहित पवार म्हणाले आहेत.
मंत्रालयातील महागड्या काळ्या गाडी प्रकरणात कुमार मोरदानीचे नाव मी घेतले, मंत्री माननीय विखे पाटील साहेबांचे नाव कुठेही घेतले नाही किंवा त्यांच्याकडे सूचक इशारा देखील केला नाही, तरीही त्यावर विखे पाटील साहेब प्रतिक्रिया देत असतील तर हे समीकरण न समजणारे आहे. आता गाडी कुणामुळे आली?…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 18, 2025