Rohit Pawar On Ajit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजितदादांचा अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.
विमानांच्या टाक्या पूर्ण भरण्याची काय गरज होती? असं या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच स्फोट का झाला त्याचं कारण अतिरिक्त इंधन होते आणि इंधन टाक्यांबाबत मी शंका उपस्थित केली होती असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. डिजिसीएच्या निकशांपेक्षा कमी दृश्यमानता होती असं देखील रोहित पवार म्हणाले. तसेच विमान मुद्दाम आदळण्यात आलं असा संशय देखील रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना घेतला आहे.
तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यू प्रकरणात खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम विमान कंपनीकडून करण्यात येत असल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कंपनीकडून खोटी कागदपत्र तयार करण्यात येत असल्याचा दावा करत आता रोहित पवार यांनी डिजिटल कागदपत्रं हवीत अशी मागणी केली आहे.
तर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या पत्रकार परिषदेत ब्लॅकबॉक्सवर देखील भाष्य करत 1100 अंशांना एक तास जळला तरच ब्लॅकबॉक्स निकामी होते असं म्हटलं आहे. मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा मोठा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे. तर आमच्यासारखा बिना बॅकग्राउंडचा, बिना सरकारमधील व्यक्ती एवढी माहिती गोळा करू शकतो मग सत्तेतील लोकांना हे का शक्य नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थितीत केला आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, हे विमान मुंबईवरुन बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते पण मग फ्यूल टँक पूर्ण भरण्याची गरत नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणर होतं. मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात फ्यूल भरता आला असता. मुद्दाम पायलटचा वापर करुन घातपात झाला असावा. विमानात फ्यूल जास्त असलं तर स्फोट मोठा होईल ही शंका खरी ठरत आहे असं या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले.
अहिल्यानगर एम.आय.डी.सी. येथे कंपनीच्या उद्योजकाकडुन खंडणी घेणारा आरोपी जेरबंद
28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार बारामती येथे एका प्रचार सभेला जात असताना त्यांच्या विमान अपघातात त्याचं निधन झालं होतं. यानंतर अजित पवार यांचं अपघात की घातपात याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
