Rohit Pawar : काही दिवसांपासून राज्यात प्रकल्प परराज्यात नेण्यावरुन चांगलच राजकारण तापलंय. या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी चांगलचं घेरल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार((Rohit Pawar)) यांनीही एक्सवर एक पोस्ट शेअर करीत सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. प्रकल्प परराज्यात गेल्याने तरुणांचा रोजगार हिरावल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर केलीयं.
SC च्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवींचे निधन, वयाच्या ९६ वर्षी घेतला अखेरचा श्वास
गेल्या अडिच वर्षामध्ये वारंवार राज्यात येणारे विविध उद्योग आणि प्रकल्प परराज्यात जात आहेत. त्यामुळे राज्याच्या विकासाला खिळ बसत आहे. त्याचबरोबर राज्यातील तरूणांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी आणि उद्योग मंत्र्यांवर टीका केली जात आहे. त्यात आता आणखी एक प्रकल्प राज्यातून बाहेर गेला आहे. त्यामुळे रोहित पवारांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली.
अपात्रतेच्या यादीतून नाव वगळताच कोल्हेंनी घेतली अजितदादांची भेट, पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधान
वेदांता-फॉक्सकॉन सहित राज्यातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर उद्योग मंत्र्यांनी राज्यात मोठा प्रकल्प आणण्याची ग्वाही दिली होती. मात्र एकामागून एक प्रकल्प इतर राज्यात जात असताना राज्य सरकार कमालीचे अनभिज्ञ दिसते. अलिकडेच मारुती सुझुकी कंपनी तब्बल 20,000 कोटींची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 23, 2023
रोहित पवार यांनी याबद्दल एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, ‘वेदांता-फॉक्सकॉन सहित राज्यातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर उद्योग मंत्र्यांनी राज्यात मोठा प्रकल्प आणण्याची ग्वाही दिली होती. मात्र एकामागून एक प्रकल्प इतर राज्यात जात असताना राज्य सरकार कमालीचे अनभिज्ञ दिसते.
काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे दूर होणार? ‘इंडिया’ आघाडीसाठी आंबेडकरांचा आणखी एक डाव
अलिकडेच मारुती सुझुकी कंपनी तब्बल 20,000 कोटींची गुंतवणूक करून त्यांचा प्रोडक्शन प्लांट गुजरातमध्ये सुरू करत आहे. यामुळे हजारो रोजगार तयार होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. हाच प्रकल्प महाराष्ट्रात आला असता तर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा मिळाला असता. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या केवळ गप्पा मारून चालणार नाही, तर त्यासाठी वेळोवेळी लक्ष ठेवून महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प गुंतवणूक राज्यात आणावी लागेल. अशी टीका पवार यांनी केली आहे.