अपात्रतेच्या यादीतून नाव वगळताच कोल्हेंनी घेतली अजितदादांची भेट, पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधान

  • Written By: Published:
अपात्रतेच्या यादीतून नाव वगळताच कोल्हेंनी घेतली अजितदादांची भेट, पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधान

Amol Kolhe Met Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट तयार झाले. शिवसेनेसारखा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे, यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू आहे. अशातच काल शरद पवार गटाने काल राज्यसभा सभापतींची भेट घेऊन अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला. त्यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे दूर होणार? ‘इंडिया’ आघाडीसाठी आंबेडकरांचा आणखी एक डाव 

विशेष म्हणजे याचिकेतून राज्यसभेचे खासदार शरद पवार, लोकसभेतील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावे वगळण्यात आली. त्याचवेळी वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेय या खासदारांची नावं अजित पवार गटाने का वगळली, असे प्रश्न निर्माण होऊ लागले. शिवाय अजित पवारांच्या याच भूमिकेमुळं त्यांच्या गटात संभ्रमाचं वातावरण आहे.

मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास त्यांना सहानुभूती मिळू शकते. याचा फटका आगामी निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर बसू शकतो. त्यामुमळं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावे याचिकेतून वगळण्यात आल्याचं बोलल्या जातं. तर अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं, असल्याचं बोलल्या जातं. त्यामुळंचं लोकसभेत आमचे दोन सदस्य आहेत, एक सुनील तटकरे आणि दुसरे अमोल कोल्हे, असा दावा अजित पवार गटाने केला. अमोल कोल्हेंची सध्याची नरमाईची भूमिका, त्यांचा कल पाहता अजित पवार गटाने त्यांचही नाव वगळलं.

वर्ल्डकपदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न; ममतांचा भाजपवर गंभीर आरोप 

अशातच आता खासदार कोल्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. अजित पवार-कोल्हे भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांच्या कार्यालयात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, अमोल कोल्हे आता जाहीरपणे अजित पवार गटाला आपला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, कोल्हेंचा नेमका पाठिंबा कुणाला याचा उल्लेख निवडणुक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत होऊ शकतो.

आतापर्यंत कोल्हेंचा शरद पवार गटाला पाठिंबा असला तरी ते शरद पवार गटाच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना, सभांना, सभांना उपस्थित राहत नाहीत. शक्य तितके अंतर राखण्याचा प्रयत्न करतात. शिवाय, ते अजित पवार गटाच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या भूमिकांवर टीका करत नाहीत. उलट त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावे, अशी भूमिका बऱ्याचदा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube