राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही…रोहित पवारांकडून तीन दिवसांचा अल्टिमेटम

विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

Rohit pawar

Rohit pawar

Mla Rohit Pawar : MPSC परिक्षेच्या घोटाळ्याप्रकरणी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी सहभाग घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत, पुढील तीन दिवसांत सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभरात आंदोलना सुरु होणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी पुणे यांना भेटण्यासाठी गेले आहेत. हा विद्यार्थ्यांचा लढा आहे, त्यांच्या भावी आयुष्यासाठी लढा आहे. सकाळपासून हजारो विद्यार्थी एक प्लेट पोहे खाऊन या मोर्च्यात सहभागी झाले आहेत. आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले MPSC मध्ये पेपर फुटी होऊ शकत नाही, राजीनाम्याशिवाय विद्यार्थी शांत बसू शकत नसल्याचं आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.

तुकाराम मुंढेंना प्रिती झिंटाचा पाठिंबा? ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट घालून दिसली अभिनेत्री, व्हिडीओ चर्चेत

तसेच अधिवेशनात देखील मी हा मुद्दा मांडला. राजीनामा देणार का हे पहिले सांगा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, तुम्ही आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांची पार्श्वभूमी पाहा, अध्यक्ष असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. मुख्यमंत्रीसाहेब ते तुमचे मित्र आहेत , त्यांना खासदारकी आमदारकी द्या पण लोकसेवा लोकसेवा आयोगामध्ये चांगल्या प्रतिमेचे अधिकारी द्या, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

गट अ ब क गटाच्या परीक्षेत घोटाळा झाला आहे. महापालिकेचे पेपर फुटले. आम्ही २० लाख रुपये देऊ शकत नाही. भ्रष्टाचार झाला हे नक्की. विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी मी शेवटपर्यंत लढेन. महाराष्ट्र हा लढणारा आहे. आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत होते पण त्यांना दाद देत नव्हते . आम्हाला निर्णय पाहिजे. अध्यक्ष यांना संविधानाच्या कलम १७ नुसार घालवता येते. हे मराठी विद्यार्थी स्वाभिमानी आहेत. तुमचे मित्राचे पुनर्वसन करा खासदार किंवा आमदार करा. पुढच्या तीन दिवसानंतर अल्टिमेटम संपणार असल्याचंही रोहित पवार म्हणाले आहेत.

Exit mobile version