Download App

… तर विधिमंडळाच्या आवारात उपोषण, ‘त्या’ प्रकरणात रोहित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा

Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जत-जामखेड MIDC प्रकरणात सुरु असलेल्या राजकारणामुळे 10 जुलै पासून

Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जत-जामखेड MIDC प्रकरणात सुरु असलेल्या राजकारणामुळे 10 जुलै पासून विधिमंडळाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना पत्र देखील दिला होता मात्र आता या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने रोहित पवार यांनी उपोषणाचा निर्णय दोन दिवस तात्पुरता स्थगित केला असल्याची माहिती दिली आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचा आश्वासन दिल्याने रोहित पवार यांनी उपोषणाचा निर्णय दोन दिवस तात्पुरता स्थगित केला आहे. तसेच त्यांनी जर कर्जत – जामखेड MIDC प्रकरणात दोन दिवसांत अधिसूचना न काढल्यास  गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात उपोषण केलं जाईल अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे की, MIDC हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील लाखो युवांच्या भविष्याचा प्रश्न आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही अधिसूचना काढण्याबाबत सरकार दिरंगाई करत असून दोन-अडीच वर्षे केवळ राजकारण सुरुय. लोकशाहीच्या पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळातही सरकारकडून धडधडीत खोटी आश्वासनं दिली जातात.

त्यामुळं नाईलाजाने उद्यापासून (बुधवार) विधिमंडळाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता आणि तसं पत्रही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना दिलं. परंतु याबाबत मुख्यमंत्री महोदयांची उद्योगमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आणि निर्णय घेण्याबाबत दोन दिवस वेळ देण्याची मागणी त्यांनी केल्याने उपोषणाचा निर्णय दोन दिवस तात्पुरता स्थगित केला. परंतु दोन दिवसांत अधिसूचना न काढल्यास युवांच्या भविष्यासाठी गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात उपोषण केलं जाईल.

भारतीय संघावर ‘गंभीर’ राज! बीसीसीआयची घोषणा, मिळाली मोठी जबाबदारी

तर दुसरीकडे आज रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन जामखेड आणि कर्जत डेपोसाठीही नवीन एसटी बसची मागणी केली आहे.  कर्जत डेपोला बस नसल्याने आणि जामखेड डेपोला पुरेशा बस नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक या सर्वांचीच गैरसोय होत असल्याने त्यांनी आज या दोन्ही बस डेपोसाठी नवीन एसटी बस उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

follow us