समृद्धी महामार्गाच्या कामात 3 हजार कोटींचा घोटाळा; अधिकाऱ्याचं नाव घेत रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

समृद्धी महामार्गाच्या कामात 3 हजार कोटींचा घोटाळा; अधिकाऱ्याचं नाव घेत रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

Rohit Pawar : समृद्धी महामार्गाच्या (Samrudhi Mahamarg) कामात 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलायं. समृद्धी महामार्गाच्या कामातून अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सर्वसामान्यांची झालीयं? असा थेट सवालही रोहित पवार यांनी यावेळी केलायं. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांचं थेट नावचं सांगितलं असून यावेळी बोलताना त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा असल्याचं दिसून आलं. ते मुंबईत बोलत होते.

गुजरातचा अधिकारी, महाराष्ट्रात 640 एकर जमीन खरेदी; संतापलेल्या वडेट्टीवारांनी सरकारला फोडला घाम

रोहित पवार म्हणाले, समृद्धी महामार्ग कशाप्रकारे भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता, कोणी किती जमीनी कशा विकत घेतल्या या खोलात मी जाणार नाही. फक्त या अधिकाऱ्यांच्या संबंधित एक छोटे उदाहरण सांगतो, २०१८ ला समृद्धी महामार्गाचं टेंडर निघालं तेव्हा टेंडरची किंमत ४९ हजार कोटी इतकी होती. त्यानंतर ४ महिन्यांतच नवं टेंडर काढण्यात आलं. तेव्हा या टेंडरची एकूण किंमत ५५ हजार कोटी रुपये इतकी करण्यात आली. म्हणजेच काय तर ४ महिन्यात टेंडरची एकूण किंमत कोट्यावधी रुपयांनी वाढली असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलायं.

सिद्धीविनायकाचं दर्शन, व्हिक्ट्री साईन अन्….; पवारांना शह देण्यासाठी अजितदादांनी नारळ फोडला

टेंडरची किंमत वाढल्याने ‘समृद्धी’ सामान्यांची झाली की अधिकारी तसेच नेत्यांची झाली हे आपल्याला यावरून कळतं. अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्या स्वत:च्या नावावर १५०० कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर १५० कोटी तर तिसऱ्या बायकोच्या २०० कोटींची मालमत्ता आहे. इतकंच नाही, तर “अधिकारी मोपलवार यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींच्या नावांवर जवळपास ८५० कोटी इतकी मालमत्ता आहे. त्यांचे भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावरही ५० कोटींची मालमत्ता आहे. अशा पद्धतीने हा आकडा एकत्रित केला तर तो ३००० कोटींच्या आसपास जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी यावेळी केलायं.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी केले राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले, ‘ते हिंदू धर्माविषयी चुकीचं बोललेच नाहीत’

आर्टस्, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचाही विचार करा…
सरकारने मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घाईघाईचा आहे, यात कॉमर्स आणि आर्टच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आलं असून त्यांंनाही 5 ते 10 हजार रुपये भरणे कठीण आहे, त्यामुळे सरकारने योजनेचा पुर्नविचार करा, असा सल्लाही रोहित पवार यांनी दिलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube