शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी केले राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले, ‘ते हिंदू धर्माविषयी चुकीचं बोललेच नाहीत’

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी केले राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले, ‘ते हिंदू धर्माविषयी चुकीचं बोललेच नाहीत’

Shankaracharya Swami Avimukteswarananda Saraswati : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान आपल्या पहिल्याच भाषणात हिंदूंविषयी एक विधान केलं होतं. राहुल गांधींच्या या भाषणानंतर भाजपने आणि काही हिंदू संघटनांनी त्यांचा निषेध केला. तर आता ज्योतिर मठाचे 46 वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteswarananda Saraswati) यांनी राहुल गांधींनी हिंदू धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

काँग्रेसच्या ‘सात’ मतांवर महायुतीची नजर : मिलिंद नार्वेकर अडचणीत येणार? 

कॉंग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा एक व्हिडिओ ट्वीट केलं. त्यात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणतात की, राहुल गांधींनी हिंदू धर्मविरोधी वक्तव्य केल्याचं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं. तेव्हा आम्ही संसदेतील राहुल गांधींचे संपूर्ण भाषण ऐकलं. ते हिंदू धर्माविषयी काहीच चुकीचं बोलले नाहीत. हिंदू धर्मात हिंसेला स्थानच नाही, असंचं राहुल गांधी स्पष्टपणे सांगत आहेत.

त्यांच्यावर हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केलं असा आरोप करणं, त्यांच्या भाषणातील काही भाग काढून त्याचा प्रसार करणं हा गुन्हा आहे. हा अपप्रचार आहे. असे करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मग ते माध्यम प्रतिनिधी का असेनात? हे चुकीचे आहे, असं ते म्हणाले.

शंकाराचार्य पुढं म्हणाले की, त्यांनी समोरच्या बाजूला बसलेल्या लोकांना उद्देशून तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणता आणि हिंसा हिंसा म्हणत द्वेष पसरवता, असं म्हटलं. त्यांच म्हणणं विशिष्ट पक्षाासाठी आहे, असंही शंकराचार्य म्हणाले.

राहुल गांधींचं वक्तव्य काय होतं?

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्या भाषणात राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर जातीय आधारावर लोकांमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. राहुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही. कधीही द्वेष आणि भीती पसरवू शकत नाही. त्यामुळे हे लोक (सत्ताधारी पक्ष) हिंदू नाहीत. कारण ते 24 तास हिंसेवरच बोलत असतात. नरेंद्र मोदी, भाजप किंवा आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असं असं राहुल गांधी म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube