सिद्धीविनायकाचं दर्शन, व्हिक्ट्री साईन अन्….; पवारांना शह देण्यासाठी अजितदादांनी नारळ फोडला
Ajit Pawar Planning for Checkmate Sharad Pawar in Assembly Election : लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची झालेली पिछेहाट आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) वाढलेला पक्षाचा स्ट्राईक रेट पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये (Assembly Election) ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि पवारांना शह देण्यासाठी अजितदादा कामाला लागले आहेत. यासाठी त्यांनी आज (9 जुलै) ला मुंबईमध्ये श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला. बाहेर आल्यानंतर या सर्वांनी विधानसभेत विजय मिळवण्याच्या विश्वासाने व्हिक्ट्री साईन दाखवली.हा विषय चर्चेचा ठरला.
Mirzapur 4: मिर्झापूर सीझन 4 मध्ये ‘या’ पाच कलाकारांचा पत्ता कट? खरं कारण आलं समोर
यावेळी अजित पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी देखील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. तर बाहेर आल्यानंतर या सर्वांनी विधानसभेत विजय मिळवण्याच्या विश्वासाने व्हिक्ट्री साईन दाखवली. हा विषय चर्चेचा ठरला. त्यार माध्यामांकडून विचारण्यात आले असता अजित पवार म्हणाले की, आगामी निवडणुकीमध्ये आम्ही जनतेसमोर जाणार असल्याने जनता आणि सिद्धविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत यासाठी व्हिक्टरीची खूण दाखवली. तर विधानसभेसाठी 14 तारखेला आमची पहिली रॅली बारामतीमधून आम्ही सुरू करतोय. असं देखील अजित पवार म्हणाले.
Video: धक्कादायक घटना! हात अन् पाय पकडून महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार आहोत. त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Singer Usha Uthup यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, पती जानी चाको उथुप यांचं निधन
या अगोदर सोमवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय झाली त्यानंतर आज सकाळी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र जमून बसने श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिध्दीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे.
शेवटी जनता – जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.