Rohit Pawar On NDA : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ऑपरेशन तुतारी अंतर्गत शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार असा दावा करण्यात येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची यासाठी चर्चा देखील सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या चर्चेसाठी जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची बैठक देखील झाली असून लवकरच याबाबात शरद पवार निर्णय घेणार असं सांगितलं जात आहे. तर दुरीकडे आता ऑपरेशन तुतारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य करत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, आमची केंद्रात कोणत्याही एनडीएच्या नेत्या सोबतही चर्चा सुरु नाही. काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा सुरु नाही. तसेच राज्यातही कोणासोबत चर्चा नाही. आज आम्ही विरोधतला पक्ष, शिव-शाहू-फुले- आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 60 वर्ष भाजपच्या विचारांच्या विरोधात लढलेला पक्ष आहे. आज फक्त महाराष्ट्रात धर्म आणि सर्वसामान्यांची भूमिका मांडत आहोत असं माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले.
तर दुसरीकडे जयंत पाटील (Jayant Patil) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याभेटीवर बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दत्ता भरणे म्हणाले की, मला याबाबत काहीच माहिती नाही. विनोद तावडे आणि जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षविरहित त्यांचं नातं आहे. त्यामुळे ते भेटले असावेत असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
राम मंदिराचे अंतरिम महासचिव माजी IFS अधिकारी कृष्ण मोहन कोण आहेत? –
10 आमदार अन् 8 खासदार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 आमदार आणि 8 खासदार असल्याने लोकसभेत पक्षाची मोठी ताकद आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाच साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
