Krishna Mohan : राम मंदिराचे अंतरिम महासचिव माजी IFS अधिकारी कृष्ण मोहन कोण आहेत?
Krishna Mohan : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असून या प्रकरणावरुन विरोधक
Krishna Mohan : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असून या प्रकरणावरुन विरोधक भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची बैठक पार पडली. या बैठकीत ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहे. या बैठकीत ट्रस्टने हंगामी महासचिव म्हणून कृष्ण मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण मोहन यांनीच राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात एफआयआर दाखल केला होता.
कृष्ण मोहन (Krishna Mohan) हे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहाबाद विधानसभा मतदारसंघातील चंद्रपूर (Chandrapur) गावचे रहिवासी आहेत. ते 2012 पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. ते भारतीय वन सेवेचे निवृत्त अधिकारी आहेत. भारतीय वन सेवेत (IFS) असताना त्यांनी महाराष्ट्र केडरमध्ये सेवा बजावली होती. सप्टेंबर 2025 मध्ये कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर कृष्ण मोहन यांची नवीन विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) त्यांची सदस्य म्हणून एकमताने निवड केली होती.
कृष्ण मोहन यांचे शिक्षण लखनौ विद्यापीठात झाले. त्यानंतर, भारतीय वन सेवेसाठी निवड होण्यापूर्वी त्यांनी काही काळ अणुऊर्जा विभागात काम केले आणि वन सेवेत असताना महाराष्ट्रात सेवा बजावली. 2012 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले आणि याच कार्यामुळे त्यांना ट्रस्टमध्ये स्थान मिळाले. हंगामी महासचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, कृष्ण मोहन यांनी व्यवस्थापन आणि कामकाजातील त्रुटींचा इतरांनी गैरफायदा घेतल्याचे त्यांनी मान्य केले.
रोनाल्डोचे स्वप्न अधुरेच, फिफा विश्वचषक 2026 मध्ये पोर्तुगालचा प्रवास थांबला
कृष्ण मोहन यांनी सांगितले की, ट्रस्टची प्रतिमा मलिन करणाऱ्या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील तसेच, ही डागाळलेली प्रतिष्ठा पूर्ववत करण्यासाठी सर्व विश्वस्त मिळून काम करतील असेही त्यांनी नमूद केले.