देशाला मिळाले 15 वे उपराष्ट्रपती; सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न
CP Radhakrishanan हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथग्रहण केली

CP Radhakrishanan take Oth as vice President of India : उपराष्ट्रपती पदाची बुधवारी (9 सप्टेंबर) रोजी मतदान झालं. त्यानंतर त्याचा निकाल समोर आला असून ही निवडणूक एनडीएने जिंकली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन हे यामध्ये देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथग्रहण केली.
सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सीपी राधाकृष्णन यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह कॅबिनेचमधील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमु्ख्यमंत्री यांना देखील या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी…
निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आले आहे. (President) एनडीएकडे एकूण 427 खासदार होते, मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या 11 खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केले, त्यामुळे हा आकडा 438 पर्यंत पोहोचते. मात्र सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण 452 मते मिळाली, याचा अर्थ 14 विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली. याच कारणामुळे बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 314 मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले.
72 तासांत इस्त्रायलच्या हल्ल्यांनी 6 मुस्लिम देश उध्वस्त; कतार ते येमेन कसे अन् किती हल्ले?
सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. ते 1973 मध्ये वयाच्या 1 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले.
भाजपचे महत्वाचे नेते
सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते. 2004, 2012 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही काम केलेले आहे. तसेच ते काही काळ पुदुच्चेरीचे उपराज्यपालही होते.