दानचोरी प्रकरणानंतर राममंदीर ट्रस्टचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड अन् जमिनीवर बसून होणार मोजणी
Ram Mandir Trust donation theft प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राममंदीर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे.
Major decision by Ram Mandir Trust after donation theft dress code Employees and counting seated on floor : अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राममंदीर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. आता मंदिरातील कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. तसेच देणगीची मोजणी आता जमिनीवर बसून होणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मी नाही ‘ते’ चालवतात! सुधीर मुनगंटीवारांचे थेट भाजप प्रमुखांकडं अंगुलीनिर्देष
अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार प्रकरणानंतर दान मोजणी प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दानाची मोजणी अधिक पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने व्हावी, यासाठी प्रशासनाने नवीन नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.
‘मालिकांचा बादशहा’ आता रुपेरी पडद्यावर! दिग्दर्शक अजय मयेकर यांचा ‘मर्दिनी’ ठरणार नवा टप्पा
मिळालेल्या माहितीनुसार, यापुढे दानाची मोजणी टेबल किंवा खुर्चीवर न करता जमिनीवर बसून केली जाणार आहे. तसेच मोजणी कक्षात मोबाईल फोन, कॅमेरा, बॅग किंवा इतर कोणतेही वैयक्तिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना चप्पल किंवा बूट घालून मोजणी कक्षात प्रवेश करता येणार नाही.
दान मोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निश्चित ड्रेस कोडचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गडद निळ्या रंगाचा आणि कोणत्याही प्रकारचे खिसे नसलेला गणवेश परिधान केल्यानंतरच त्यांना कक्षात प्रवेश दिला जाईल. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन स्तरांवरील सुरक्षा तपासणीनंतरच मोजणी कक्षात प्रवेश मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Telegram : पायरेटेड कंटेट 15 दिवसात हटवा; केंद्र सरकारचा टेलिग्रामला अल्टिमेटम
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अनुकल्प मिश्राबाबतही नवे तपशील उघड होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मंदिर प्रशासनाकडून त्याला व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या नावाने प्रवेशपत्र (एंट्री पास) दिले जात होते. मंदिरातील विशेष कार्यक्रम आणि धार्मिक सोहळ्यांच्या वेळी हा पास तयार केला जात असल्याचे सांगितले जाते.तपासादरम्यान असा आरोपही समोर आला आहे की, याच प्रवेशपत्राचा वापर करून संबंधित आरोपी दान मोजणी कक्षात प्रवेश करत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचाही शोध घेतला जात आहे.