Rohit Pawar’s MNS style after Pune poisonous liquor case Liquor dens busted in Hadapsar : पुण्यातील दापोडी फुगेवाडीत विषारी दारुमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे. अद्याप देखील या विषारी दारु प्राशन केलेल्या परिसरातील इतरही नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मनसे स्टाईलने पुण्यात हडपसरमध्ये दारूचे अड्डे फोडले आहेत.
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात आलं ‘USB कंडोम’; मोबाईल चार्ज करताना नक्की काय होणार?
पुण्यामध्ये ही विषारू दारूकांडाची घटना घडल्यानंतर या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहत पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोहचले. यावेळी त्यांनी थेट या ठिकाणी असलेले दारूचे अड्डे फोडले. त्यामुळे परिसरात काही काल तणाव निर्माण झाला होता. यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र रोष व्यक्त केला आहे.
नेमकं का म्हणाले रोहित पवार?
पुण्यात हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत भीषण आणि गृह विभागाच्या बेलगाम आणि भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेत मृत्यू झाल्याबाबतच्या कारणांचा काही अहवाल आहे का, याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेचं कारण सांगून हा अहवाल दाखवता येत नसल्याचं थातूरमातूर कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं.
हे अत्यंत गंभीर प्रकरण असून अनेकजण अजूनही मृत्यूशी झुंजत आहेत. राज्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांविरोधात वारंवार आवाज उठवूनही सरकार त्याला आळा घालू शकलं नाही आणि यामुळंच अवैध दारू पिऊन 18 जणांचा बळी गेला, याची पूर्णतः जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. पाशवी बहुमतामुळं हे सरकार केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेत आहे पण नैतिकदृष्ट्या या सरकारने कधीच जनतेचा विश्वास गमावलाय. त्यामुळं आपल्या जबाबदारीचं थोडं जरी भान या सरकारला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी.
