Download App

रुपाली चाकणकर थेट अजितदादांच्या व्यासपीठावर; तटकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. कालच्या बंडानंतर आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन टीम जाहीर केली आहे. खासदार सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. तटकरेंनी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. (Rupali Chakankar has been re-appointed as Nationalist Congress Women’s Regional President by Tatkare)

काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद देण्यात आले होते. त्या साध्य देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. आता त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या विद्या चव्हाण यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्या चव्हाण सध्या शरद पवार यांच्या सोबत आहेत.

महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर नियुक्त्या :

यावेळी सुनिल तटकरे यांनी विविध संघटनात्मक नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केली. तर युवक काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. यावेळी प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, तटकरे यांनी दिली.

कोण आहेत रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर या दौंडच्या असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला. पण त्यात फारसं यश मिळालं नाही. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या. रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला.

जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना झटका; शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई

2002 पासून पुढची 5-6 वर्षं रुपाली चाकणकर यांनी परिसरातील महिला बचतगटासाठी काम केलं. पुढे चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. रुपाली चाकणकर यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांची पुणे शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अचानक भाजपात प्रवेश करून धक्का दिला. तेव्हा रुपाली चाकणकर यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पदाची जबादारी देण्यात आली. आता पुन्हा अजित पवारांच्या बंडानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबादारी दिली आहे.

 

 

 

Tags

follow us