Download App

‘आधी प्रायश्चित्त घ्या, आरोग्यमंत्र्यांना पायउतार करा’; कळव्यातील मृत्यूप्रकरणी ठाकरे गटाचा घणाघात

Saamana Editorial : ठाण्यातील महापालिका रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या घटनेने राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. रुग्णालायाचा कारभार आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सामना अग्रलेखातून आज ठाकरे गटाने याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.

एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरातच टाहो फोडला. या घटनेत निष्पापांचा बळी गेला. प्रश्न कळव्यातील मृत्यूकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला! असा हल्लाबोल शिंदे सरकारवर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्यमंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्यूकांडाची जबाबदारी त्यांचीच आहे. विरोधकांवर आगपाथखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान उपटावेत, असा सल्ला या लेखातून देण्यात आल आहे.

कोल्हापूर, साताऱ्यात जमीन हादरली! भूकंपाच्या सौम्य धक्क्याने नागरिक भयभीत

आरोग्यमंत्र्यांना पायउतार करा

मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय आरोग्यदेखील बिघडलेलेच आहे. ते सुधारण्यासाठी आता जनतेलाच 2024 मध्ये मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कळवा रुग्णालयातील 18 मृत्यू 24 तासांतील आहेत. त्यामुळे आताच्या सावंतांनीही राजीनामा द्यायला हवा. ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करायला हवे. कारण प्रश्न कळव्यातील मृत्यूकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे, असे स्पष्ट करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

हवा तितका आराम करा पण, नाटक करू नका

मिंधे सरकारच्या काळात संपूर्ण राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. 13 ऑगस्टच्या रविवारी एका रात्रीत या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूकांडाने महाराष्ट्राला हादरे बसले. पण ठाणे-कळवा ज्यांचे होम ग्राउंड आहे त्या मुख्यमंत्र्यांना ते जाणवायला बहुदा दोन दिवस लागले. मुख्यमंत्र्यांची तब्बेत बरी नसल्याने ते म्हणे महाबळेश्वर येथे आराम घेत होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीस जपा, हवा तिथे हवा तेवढा आराम करा, पण जनतेच्या मदतील कसे लगेच धावून जातो याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका, असा टोला शिंदे यांना लगावला आहे.

Tags

follow us