शिंदेंचा थेट ‘मातोश्री’ला धडक देण्याचा प्लान; अहिरांना फोडत आता लक्ष्य वरळी किल्ला

Sachin Ahir सहा खासदारांनी ठाकरे गटाला केलेल्या जय महाराष्ट्रानंतर लागलेली गळती आता थेट आदित्य ठाकरे यांच्या 'होम-ग्राऊंड'पर्यंत पोहोचली आहे

Sachin Ahir Join Shinde Sena

Sachin Ahir Join Shinde Sena

Schin Ahir Join Eknath Shinde Shivsena : काही दिवसांपूर्वी सहा खासदारांनी ठाकरे गटाला केलेल्या जय महाराष्ट्रानंतर लागलेली गळती आता थेट आदित्य ठाकरे यांच्या ‘होम-ग्राऊंड’पर्यंत पोहोचली आहे. कारण, ठाकरे गटाचे निष्ठावान मानले जाणारे आणि मुंबईतील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक असलेले सचिन अहिर यांनी अखेर शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना आपल्या गोटात खेचून केवळ एक आमदार मिळवला नसून, आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील पराभवाचा ‘रणसंग्राम’ अधिकृतपणे पुकारला आहे. 

खासदारांनंतर आमदार अहिरांचीही शिंदेंना साथ! ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले?

वरळीत ‘आदित्य विरुद्ध अहिर’ थेट राजकीय द्वंद्व

वरळी हा मतदारसंघ गेल्या अनेक दशकांपासून ठाकरे कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता याच किल्ल्याला खिंडार पडले आहे. सचिन अहिर यांचे वरळी, परळ, लालबाग, भायखळा आणि दक्षिण-मध्य मुंबईत मजबूत संघटनात्मक जाळे आहे. कामगार संघटना, स्थानिक कार्यकर्ते आणि ओबीसी समाजात त्यांचा प्रभाव मानला जातो. अहिर यांचा या भागातील दांडगा जनसंपर्क, स्थानिक शाखांवरील पकड आणि ‘बेस्ट कामगार सेने’चा आधार पाहता, शिंदे गटाने त्यांना हाताशी धरून आदित्य ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. या प्रवेशामुळे वरळीत आता ‘आदित्य ठाकरे विरूद्ध सचिन अहिर’ अशी थेट लढत होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

आदित्य ठाकरे यांना घेरण्याची रणनीती

राजकीय विश्लेषकांच्या मते, अहिर यांच्या प्रवेशामागे काही महत्त्वाचे राजकीय संदेश दडलेले आहेत. यात पहिले कारण म्हणजे ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेची माहिती असलेला नेता शिंदेसेनेत गेल्याने स्थानिक राजकीय समीकरणे बदलू शकतात. दुसरं म्हणजे, बेस्ट कामगार सेना आणि कामगार संघटनांमध्ये सचिन अहिर यांचा प्रभाव असल्याने पारंपरिक शिवसैनिक आणि कामगार मतदारांमध्ये शिंदेसेनेची पोहोच वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तिसरं कारण म्हणजे वरळीत ठाकरे गटाला अधिक आक्रमक लढत देण्याची तयारी शिंदेसेनेने सुरू केल्याचा हा संकेत मानला जात आहे. आदित्य ठाकरेंचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव करणे, हा एकनाथ शिंदेंचा मोठा अजेंडा आहे. जर यात त्यांना यश आले, तर “ठाकरे गट संपला आहे,” असा संदेश ते संपूर्ण महाराष्ट्रात देऊ शकतील.

लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे येईल; मुख्यमंत्र्यांचा शब्द अन् जय पवारांना विश्वास

अहिर फुटलेठाकरे गटाला नेमका फटका काय?

सचिन अहिर हे मुंबईतील ओबीसी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू करून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर ठाकरे गटासोबत राहिले. कामगार संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबईतील संघटनात्मक राजकारणात त्यांचा प्रभाव असल्याने त्यांचे जाणे ठाकरे गटासाठी केवळ संख्यात्मक नाही, तर संघटनात्मक नुकसान मानले जात आहे. अहिर शिंदे गटात गेल्याने वरळी आणि दक्षिण-मध्य मुंबईतील संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता असून, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या राजकीय हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदेंची आता थेट मातोश्रीला धडक देण्याची रणनीती

एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना आपल्या गोटात खेचून केवळ एक आमदार मिळवला नाही, तर थेट ‘मातोश्री’ला धडक देण्याची एक मोठी रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी हा केवळ एक मतदारसंघ राहणार नाही, तर तो एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या राजकीय संघर्षाचे प्रतीक ठरू शकतो. यात शंका नाही.

Exit mobile version