“घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे.” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. काल राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काही योजना जाहीर केल्या आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.
१/२ घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू 'राजेशाही'कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम झाले. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. pic.twitter.com/LwvKIg2yVt
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 9, 2023
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातल्या योजनांनात्यांनी पंतप्रधान मोदी यांची नावे दिली आहेत. ज्यामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ तसेच ‘मोदी आवास घरकुल योजना’ या योजनांचा समावेश आहे. सावंत यांनी याचाच उल्लेख करत देश हा राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे.
हेही वाचा : NAAC : कॉलेज, युनिव्हर्सिटींना गुणवत्ता रँक देणारी नॅक वादात का?
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम झाले. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. जे अगोदर इराक, उत्तर कोरिया , रशिया सारख्या काही देशात दिसले होते ते लवकरच सर्वत्र भारतात दिसेल असे वाटते.”
यासोबत त्यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे फोटो देखील जोडले आहेत. त्यामुळे यावर भाजपकडून काय उत्तर येईल, हेही पाहणे महत्वाचे आहे.