Download App

Sachin Vaze ला जामीन मंजूर, पण तुरुंगातच रवानगी; कारण…

Sachin Vaze : सचिन वाझे(Sachin Vaze) याला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील नामंकित व्यापाऱ्याने सचिन वाझे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणीदरम्यान सचिन वाझेला 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा? महिन्याभरापूर्वीच दोन्ही गटाकडून अर्ज, प्रशासनासमोर पेच

एका व्यापाऱ्याने खंडणी मागितल्याचा आरोप सचिन वाझेवर केला. विमल अग्रवाल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. त्यांनी सचिन वाझेवर खंडणाचा गुन्हा दाखल केला आहे. वाझे नावाजलेले अधिकारी असल्याने अनेक प्रकरणांमध्ये त्यांच नाव समोर आलं होतं. त्याच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये सीबीआय आणि एनआयएकडून तपास सुरु आहे.

Vishal Vs CBFC: सेन्सॉर बोर्डावरील आरोपाची CBI चौकशी करा, निर्मात्याची मागणी

खंडणी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये एकूण पाच जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह गुंड रियाज भाटी, सचिन वाझे, अल्पेश पटेल, सुमित सिंग आहेत. मात्र, न्यायालयाकडून सुमित सिंगसह अल्पेश पटेलला जामीन मिळाला.

Ajit Pawar : अजित पवारांमुळे भाजपला फरक पडत नाही; मंत्र्याने थेट गणितच मांडलं

एकूणच सचिन वाझेची 4 गुन्ह्यांमध्ये सीबीआय आणि एनआयएकडून चौकशी आहे. त्यातील एका खंडणीच्या प्रकरणामध्ये वाझेंना जामीन मंजूर झाला. मात्र, इतर गुन्ह्यांमध्ये त्यांची तुरुंगातच रवानगी असणार आहे. कारण अॅंटिलिया स्फोटकासह इतरही गुन्ह्यांप्रकरणी वाझेंची चौकशी सुरु आहे.

बारामती ॲग्रोवर मध्यरात्री 2 वाजता कारवाई; वाढदिवसानिमित्तच्या ‘गिफ्ट’साठी रोहित पवारांनी मानले आभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार आहेत. या प्रकरणात माजीमंत्री अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुनच बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याची कबूलीच सचिन वाझे यांनी दिली होती. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये अटकेत असलेले सचिन वाझे यांना एका प्रकरणात दिलासा मिळाल्याचं समोर येत आहे.

तुरुंगातच असताना सचिन वाझेने आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सीबीआयनेही माफीचा साक्षीदार होण्यास हरकत न दाखवल्याने न्यायालयानेही माफीचा साक्षी होण्यास मान्यता दिलीयं. यावेळी तुरुंगातच रवानगी असेल तर माफीचा साक्षीदार होण्याचा उद्देश नष्ट होण्याच्या शक्यतेचा अर्ज वाझेकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता.

दरम्यान, सचिन वाझे यांचा अॅंटिलियासमोरील स्फोटकं प्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे तर मनसुख हिरेन प्रकरणी सीबीआयकडून त्यांचा तपास सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

Tags

follow us