Ajit Pawar : अजित पवारांमुळे भाजपला फरक पडत नाही; मंत्र्याने थेट गणितच मांडलं

Ajit Pawar : अजित पवारांमुळे भाजपला फरक पडत नाही; मंत्र्याने थेट गणितच मांडलं

Ajit Pawar : अजित पवार भाजपबरोबर आले असून त्यांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. बहुमतातील सरकार असताना अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोबत घेण्याची भाजपला गरज नव्हती, असे सांगितले जात होते. दुसरीकडे मात्र अजित पवार सोबत आल्याने राज्यात भाजप (BJP) युतीला बळ मिळाले असून आगामी निवडणुका एकत्रितच लढण्याच विचार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता भाजपच्याच नेत्याने केलेल्या एका वक्तव्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आजमितीस राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. 18 कोटी सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला काही फरक पडेल असे वाटत नाही. जो काही फायदा, तोटा होईल तो भविष्यात समजेलच असे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपाचे सातारा संपर्क प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी केले आहे.

जेलमधून छगन भुजबळ जामिनासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप

मंत्री मिश्रा यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. मिश्रा म्हणाले, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, जी 20 परिषद आणि 13 हजार कोटींची महत्वाकांक्षी विश्वकर्मा योजना यांमुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना गती दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राज्यातील सर्व 48 जागा निवडून आणणार आहोत. साताऱ्यातील निवडणुकीत कोणता चेहरा असणार या प्रश्नावर मिश्रा म्हणाले, याबाबत अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठक होईल त्याबाबत योग्य व्यक्तीचा निर्णय होईल. त्यावेळी नावे जाहीर केली जातील. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समितीकडे चर्चा सुरू असल्याचेही मिश्रा म्हणाले.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली सुनावणीची तारीख 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. नेत्यांकडून मात्र मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली जात आहे. यंदा शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांच्यासह अन्य मित्रपक्षांचा विचार करून जागावाटप करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या मंत्र्यांकडून असे वक्तव्य केले गेले आहे. आता यावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube