जेलमधून छगन भुजबळ जामिनासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप

जेलमधून छगन भुजबळ जामिनासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप

Ramesh Kadam On Chagan Bhujbal : जेलमध्ये असताना मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Ramesh Kadam)यांना ब्लॅकमेल (Blackmail)करायचे असा धक्कादायक आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. रमेश कदम यांनी पंढरपूरमध्ये(Pandharpur) माध्यमांशी संवाद साधला. कदम हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर जेलबाहेर आले आहेत. माजी आमदार कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी ते जेलमध्ये होते.

Mathura Train Accident : कंट्रोल पॅनेलवर बॅग, हातात फोन अन् लोको पायलटच्या बेजबाबदारपणाने रेल्वेचा अपघात

रमेश कदम यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रमेश कदम म्हणाले की, छगन भुजबळ हे शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करत असत. भुजबळ जामिनासाठी कायम धडपड करत असायचे. जामिन न मिळाल्यास आपल्याला वेगळा रस्ता निवडावा लागेल, असा दम देऊन भुजबळ हे पवारांना ब्लॅकमेल करत होते, असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे.

रणबीर कपूरला बर्थडे गिफ्ट! बहुचर्चित ‘अॅनिमल’चा टीझर रिलीज…

त्याचवेळी रमेश कदम म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासारख्या आयडीया मी वापरल्या असत्या तर माझा देखील जामीन लगेच झाला असता. पण तसं न करता आपण निर्दोष आहोत हे न्यायालयात सिद्ध करायचं असल्यामुळे आपण आठ वर्ष जेलमध्ये काढल्याचेही रमेश कदम यांनी सांगितले.

छगन भुजबळ आणि आपली जेलमध्ये भेट व्हायची. तेव्हा शरद पवार साहेबांनी आपल्याला मदत केली पाहिजे. जामिनाला जास्तच उशीर होत असल्याची नाराजी त्यावेळी भुजबळ यांनी बऱ्याचदा बोलून दाखवली होती, असेही यावेळी रमेश कदम यांनी सांगितले.

तुरुंगामध्ये असणारे छगन भुजबळ रोज आजारी पडायचे पण आत्ताचे छगन भुजबळ अत्यंत तंदुरुस्त आहेत. ते एवढे तंदुरुस्त आहेत की, ते आता कुठे बातमी ऐकली नाही की, छगन भुजबळ यांना कधी कोणता त्रास झाला. शेवटी जेल हे कोणाच्याही नशिबात असू नये, कारण जेल हा नरक आहे. पण काही लोकांना आठ दिवसात छातीत दुखतं, काही पण होतं. मग त्याच्या आधारावर लोकांची, नेत्यांची सहानुभूती मिळवायची आणि बेल मिळवायची, अशा पद्धतीने छगन भुजबळ यांनी केलं. पण आता छगन भुजबळ एकदम तंदुरुस्त दिसत आहेत.

माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने कदम यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

जामिनावर सुटल्यानंतर कदम यांनी आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांनी मतदारसंघातील गावांना भेटी द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी आज पंढरपूरमध्ये जाऊन विठूरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube