Mathura Train Accident : कंट्रोल पॅनेलवर बॅग, हातात फोन अन् लोको पायलटच्या बेजबाबदारपणाने रेल्वेचा अपघात

Mathura Train Accident : कंट्रोल पॅनेलवर बॅग, हातात फोन अन् लोको पायलटच्या बेजबाबदारपणाने रेल्वेचा अपघात

Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर पायलटच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. रेल्वेच्या कंट्रोल पॅनलवर बॅग आणि पायलटच्या हातात फोन असल्याचं समोर आलं आहे. एवढचं नाहीतर हा पायलट मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही आढळून आले आहे. रेल्वे सुरु असताना पायलट मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असल्यानेच हा अपघात घडला आहे.

Kolhapur Politics : पाटील विरुध्द महाडिक लढतीत, आता शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत एंट्री!

या अपघाताच्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले असून रेल्वे प्लॅटफॉर्म तोडून वर कशी चढली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघाताचा तपास सुरू असून सूत्रांच्या माहितीनुसार, अहवालात असे म्हटले आहे की रेल्वेने प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग तोडला आणि अर्धा डबा प्लॅटफॉर्मच्या वरच्या भागावर चढला, अद्याप तपास अहवाल जाहीर झालेला नसून ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Baramati Agro : कारवाईचे निर्देश देणार ‘ते’ दोन बडे नेते कोण? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, ही चूक ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टीम’द्वारे उघड झाली आहे. रेल्वे आल्यानंतर सर्व प्रवासी उतरले होते. यानंतर रेल्वेचा पायलट मोबाईलवर काहीतरी पाहत होता. तो इंजिनजवळ पोहोचला, त्याने सहजरित्या बॅग इंजिनच्या कंट्रोल पॅनलवर ठेवली. यावेळी तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. बॅगेच्या दाबामुळे कंट्रोल पॅनल पुढे सरकले आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढली. आता या प्रकरणात पाच जणांना आरोपी करण्यात आले असून त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाचे कारण समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. “भावाने इतिहास घडवला. जेव्हा रेल्वे पहिल्यांदा चढली तेव्हा कोणीतरी लिहिलं होतं, अरे भाऊ, गरीब माणूस, तू तुझा मोबाईलही चेक करू शकत नाहीस का? भाऊ, रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढली की आकाशात उडू लागला काही फरक पडत नाही, पगार पूर्ण मिळतो, वेतन आयोगही येत राहतो, त्यात काळजी करण्याची काय गरज…! आता तुमची नोकरी गेली तर काय… जाऊ दे… ढोंगी, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube