Saga of Chhagan Bhujbal’s displeasure over Rajya Sabha nomination shows no signs of ending : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ (NCP) नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. मात्र, आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंनंतर देखील भुजबळांच्या या नाराजीच्या वक्तव्यांची मालिका कायम आहे. आज बुधवारी पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
एखाद्या जागेसाठी उमेदवार निवडत असताना पक्षातील प्रत्येकाची मतं जाणून घेणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. त्या गोष्टी बाहेर पडल्यानंतर त्यात काही वाद आहे असा अर्थ देखील नाही. सर्व काम करतात त्यामुळे सर्वांना पदं देणं शक्य नाही. मात्र आज ना उद्या पक्ष हा प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करतो.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक; अनेक दिवसांनंतर मांडली सविस्तर भूमिका
दरम्यान या अगोदर भुजबळांनी म्हटलं होतं की, राजकारणात कष्ट आणि मेहनत सगळेच जण करतात. मात्र काही लोक असतात जे कष्ट न करता पुढे जातात. पण पक्षासाठी एक-एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपआपसात जरी मतभेद झाले तरी देखील आपण घर सोडत नाही. तर आपली मतं मांडतो. असं म्हणत भुजबळ यांनी आज बुधवारी पुन्हा राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
