भुजबळ, विखे पाटील अन् झिरवळांचा दावा खोटा? मुंढे म्हणतात कारवाया मीच स्वतः करतोय…

Tukaram Mundhe यांनी या कारवाया कोण सांगत? या प्रश्नाचं उत्तर दिलं. यामध्ये भुजबळ, विखे आणि झिरवळ म्हटले होते या कारवाया आम्हीच करायला लावतोय

Tukaram Mundhe's warning: 'Disha curriculum' must be mandatory, otherwise special school grants will be stopped!

Tukaram Mundhe says personally carrying out actions but Bhujbal Vikhe and Zirval says We directed : प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. मात्र या दरम्यान मंत्री छगन भुजबळ, विखे पाटील आणि नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं की, मुंढेंना या कारवाया आम्हीच करायला लावत आहोत. मात्र या श्रेयवादामध्ये आता मुंढे यांनी थेट ट्विट करतच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?

मुंढे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे. याच दरम्यान त्यांच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याचे कारण म्हणजे मंत्री छगन भुजबळ, विखे पाटील आणि नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं की, मुंढेंना या कारवाया आम्हीच करायला लावत आहोत.यावर जेव्हा एका वृत्तपत्रामधील लेखामध्ये मुंढे तुम्हाला या कारवाया करायला कोण सांगत? त्यावर ट्विट करत मुंढे यांनी उत्तर दिले की, मी स्वतःच स्वतःला,नागरिकांच्या अपेक्षांनी आणि त्यांच्या संघर्षांनी… असं म्हणत मोजक्या शब्दांमध्ये आपल्या कारवायांमागील कारण आणि ते कुणीही नाही आपण स्वत:करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण; भारत-मॉरिशस मैत्रीचे प्रतीक ठरला शताब्दी सोहळा

 

follow us