Download App

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर! बाल वाङमय पुरस्काराचे सावंत तर युवा पुरस्काराचे कोकरे ठरले मानकरी

Sahitya Akademi awards चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बाल वाङमय पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

Sahitya Akademi awards announced Sawant wins Children’s Literature Award, Kokare wins Youth Award : यावर्षीचे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बाल वाङमय पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप कोकरे हे मानकरी ठरले आहेत. याबद्दल लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून माहिती दिली.

ब्रेकिंग : 15 ऑगस्टपासून FASTag चा वार्षिक पास ; नितीन गडकरींची मोठी घोषणा

विश्वास पाटील यांनी लिहीले की, काही वेळापूर्वी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या कार्यालयातून भारताच्या 23 भारतीय भाषेतील यंदाचे युवा आणि बालवाङ्मय पुरस्कार जाहीर झाले. ज्यामध्ये मराठीतील ज्येष्ठ बालवांग्मय लेखक नांदेडचे डॉ. सुरेश सावंत यांच्या “आभाळमाया”या ग्रंथाचा समावेश आहे. तसेच मराठीतील तरुण लेखक श्री प्रदीप कोकरे यांच्या “खोल खोल दुष्काळ डोळे” ह्या कादंबरीला यंदाचा युवावांग्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘जारण’चा बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम; 12 दिवसांत 3.5 कोटी अन् दुसऱ्या आठवड्या जमवला 1.65 कोटींचा गल्ला!

अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारांमध्ये वरील दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा व मराठी लेखकांचा समावेश आहे. डॉक्टर सावंत यांनी आजवर बालवाङ्मयात 40 पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती करून मोठे योगदान दिलेले आहे. प्रदीप कोकरे यांनी मुंबईच्या गिरणी कामगार संपाच्या नंतरचे जीवन, वाढती बेकारी आणि ग्रामीण भागातून नागर जीवनात येऊन स्थिर होऊ पाहणाऱ्या युवकांचे जग आपल्या कादंबरीमध्ये टिपलेले आहे.

follow us

संबंधित बातम्या