Download App

Shirdi Saibaba : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! काऊंटरवरच आरतीचे पास मिळणार

Saibaba devotees got aarti pass on counter : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. यातच आता साईभक्तांसाठी देवस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास मिळणे आता अधइक सुलभ झाले आहे.

कारण आता शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास हा काऊंटरवरच मिळणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साई मंदिर प्रशासनाची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शन आणि आरतीच्या पासमध्ये होणारा काळा बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधीर मुनगंटीवारांची विधानं चुकीची; जयंत पाटलांचा पलटवार

त्याचबरोबर या बैठकीमध्ये शिर्डी ग्रामस्थांनी आपल्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. ग्रामस्थांसाठीही विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले की, या पासमध्ये काळाबाजार केला जात होत. भक्तांची फसवणुक केली जात होती. दरम्यान यावर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी काही निर्णय पुढील प्रमाणे.

बैठकीत झालेले निर्णय
शिर्डी ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून मिळणार दर्शनासाठी प्रवेश
ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही
साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी
साईभक्तांना आरती पाससाठी शिफारशीची गरज नसणार
पास काऊंटरवर शिफारस विनामिळणार आरती पास
साईसंस्थान कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश

Tags

follow us