Sting Energy Drink : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये आता स्टिंग पेय विक्रीसाठी बंदी असणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग पेयबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देत मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली आहे.
स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे (Sting Energy Drink) आरोग्यावर दुष्परिणाम होत असून नियमात बसत असले तरी मुलांना याची सवय लागते. लहान मुले, गरोदर महिलांसाठी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्टिंग पेयच्या बाटलीवरचं लिहिले आहे. लहान मुलांना याची विक्री होवू नये. दारूपेक्षाही स्टिंग एनर्जी ड्रिंक हे घातक आहे अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी विधानसभेत दिली होती. यावर बोलताना मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी शाळेच्या आवारात हे विकले जातंय हे मान्य करत शाळांच्या 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह स्टिंग एनर्जी ड्रिंकवरही बंदी घालू असं आश्वासन त्यांनी दिले.
तर दुसरीकडे अनेक पेय एनर्जी देण्याच्या नावाखाली शाळा परिसरात ड्रिंक्स विक्री, फ्लेवर पानाखाली अंमली पदार्थ विक्री होते, याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी केली. यावर बोलताना याची तपासणी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या अंतर्गत सुरु असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.
हॉटेल्स, रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई
तर दुसरीकडे स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत चर्चा सुरु असताना तुकाराम मुंढे विधानभवनात दाखल झाले होते. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशानसनाकडून मोठ्या प्रमाणात धडक मोहिम सुरु करण्याात आली आहे.
पत्नीच्या वाढदिवशी अभिजीत सावंतचं खास गिफ्ट; दिला नवा फ्लॅट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
या मोहिमेत आतापर्यंत अनेक हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधातही कारवाई सुरु असून आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
