Vikram Pachpute : बनावट पनीरवर बंदी घाला; आमदार पाचपुतेंनी मंत्री झिरवळांकडे मागणी…
अॅनलॉग चीज आणि बनावट पनीरवर बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळांकडे केलीयं.
Mla Vikram Pachpute : अॅनलॉग चीज आणि बनावट पनीरवर बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते (Mla Vikram Pachpute ) यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. पाचपुते यांनी याआधीही बनावट पनीर प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात बनावट पनीर आणि अॅनलॉग चीजवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलायं. त्यानंतर आज पाचपुते यांनी झिरवळ यांची भेट घेत याबाबत कायदा असल्याचीही माहिती दिलीयं.
पुढे बोलताना आमदार पाचपुते म्हणाले, आम्ही याआधीही चीज पनीरच्या बनावट विक्रीवर आवाज उठवला होता. केंद्र सरकारच्या कायद्यानूसार राज्य सरकारला फूड कमिश्नर नेमण्याचा अधिकार आहे. फुड कमिश्नरला गरज वाटली तर एखादं प्रोडक्ट ते बंद करु शकतात. एखाद्या प्रोडक्टचे प्रोडक्शन, विक्री यावर बंदी आली घालता येऊ शकते, अशी मागणी पाचपुते यांनी नरहरी झिरवळ यांच्याकडे केलीयं.
तसेच स्टिंग ऑपरेशन करुन मी रेस्टॉरंटमध्ये जाऊन सॅंपल घेतले आहेत. त्या ठिकाणी चीज नसून अनलॉक चीज असतात. त्यावर बंदी घातली पाहिजे. राज्यात 60 ते 70 टक्के बनावट चीज पनीर विकलं जातं, याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असल्याचंही आमदार पाचपुतेंनी स्पष्ट केलंय.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्र पावसाने भिजला! 29 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी…
राज्यात सध्या एफडीएचे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. एफडीए अधिकाऱ्यांची संख्या आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात कारवाई करीत आहेत. यापुढेही मुंढे कारवाई करतीय याची आम्हाला खात्री आहे. मुंढे यांची बदली झाल्यास मी लोकप्रतिनिधी म्हणून मुंढेंसाठी उभं राहुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केलंय.