Salon and Beauty Parlor Rates Increase In Maharashtra : नव्या वर्षामध्ये केस कापणे, दाढी करणेही महागणार (Parlor Rates) आहे. देशात सध्या सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसत आहेत. खाद्य तेलापासून इंधन दरवाढीपर्यंत महागाईचा भडका उडालाय. दरम्यान आता या महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. कारण येत्या एक जानेवारीपासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार आहे. सलून आणि ब्यूटी पार्लर (Salon and Beauty Parlor Rates) असोसिएशनने हा निर्णय घेतलाय.
‘विटंबनेमागचा मास्टरमाईंड शोधा, हा कट सुनियोजित…’; वर्षा गायकवाड यांना वेगळीच शंका…
नव्या वर्षात केशकर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोशिएशनने घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून ही दरवाढ होणार (Salon and Beauty Parlor) आहे. वाढती महागाई, जीएसटी महापालिकेने वाढलेलं परवाना शुल्कामुळे भाववाढ केली जात असल्याचं संघटनेनं म्हटलंय. सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्क्यांची वाढ होणार, असं सलून संघटनेकडून सांगण्यात आलंय.
सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं; जुन्या वादातूनच दिली 5 लाखांची सुपारी, अन्…
1 जानेवारी 2025 या नवीन वर्षापासून मुंबईसह संपूर्ण राज्यातील सलूनमधील हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सौंदर्य प्रसाधन कामावरती किमान 20 ते 30 टक्के दरवाढ केली जाणार आहे.वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स , प्रोफेशनल टॅक्स, महानगरपालिकेच्या वाढती लायसन फी तसेच सलून उपयोगी वस्तूंचा वाढता दर आणि वाढत चाललेले हप्ते या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी दरवाढ करत आहे, असं सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सांगण्यात आलंय.
हेअर कटच्या दरात 20 टक्के वाढ, दाढीच्या सध्याच्या दरात 20 टक्के, हेअर कलरमध्ये 30 टक्के, क्लीन अप, फेशियल अँड डी टॅनमध्ये 30 टक्के, स्मुथनिंग अँड कॅरीटीनमध्ये 30 टक्के तर हेड मसाज, मेनिक्यूर, पेडीक्युरमध्ये 30 टक्के वाढ केली जाणार आहे. नव्या वर्षात आता केस कापायला अन् दाढी करायला देखील जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण आणखीन वाढणार असल्याचं दिसतोय.