Beauty Tips : चाळीशी नंतरही तरुण दिसण्यासाठी फॉलो करा काही खास टिप्स
वय कितीही वाढलं तरीही उतरत्या वयात आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्या जास्त भेडसावतात. वयानुसार मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्याचा थेट परिणाम हा त्यांच्या त्वचेवर होतो. महिलांच्या त्वचेवर मुरुम आणि इतर अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत त्यांचा आत्मविश्वासही कमी होत जातो.
यामुळे वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून वृद्धापकाळातही तिची त्वचा चमकदार दिसेल. आपल्यापैकी अनेक महिला या पार्लरमध्ये जाऊन त्वचेची काळजी घेतात, मात्र आपल्या अनेक मैत्रिणींना स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी हे माहिती नसतं. त्याबद्दलच माहिती देणारा हा लेख संपूर्ण वाचा.
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?
१. रात्रीचा दिनक्रम पाळला पाहिजे
40 वर्षांच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीने रात्रीची दिनचर्या पाळली पाहिजे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही रात्रीची दिनचर्या पाळली तर तुमची त्वचा खूप सुंदर होईल. यासाठी, फक्त क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग व्यतिरिक्त, तुम्हाला सीरम, फेस ऑइल आणि फेस मास्कची आवश्यकता असते.
२. अँटी-एजिंग क्रीम फायदेशीर आहे
बाजारात अनेक प्रकारच्या अँटी-एजिंग क्रीम्स उपलब्ध आहेत. ते खरेदी करताना तुम्हाला फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकाराची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार अँटी-एजिंग क्रीम खरेदी करा आणि दिवसातून दोन वेळेस लावा. त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसेल.
आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?
३. फेस मसाज करणे आवश्यक आहे
वयानंतर प्रत्येकाला चेहऱ्याचा मसाज आवश्यक असतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फेस मसाजसोबत फेस रोलर वापरू शकता. याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला ढिलेपणा येणार नाही. मसाज करताना तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य ते तेल वापरू शकता.
४. घरगुती वस्तूंचा अधिक वापर करा
प्रत्येक गोष्ट त्वचेला शोभत नाही असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे शक्यतो घरगुती उपायांचाच वापर करा. तुम्ही तुमच्या त्वचेनुसार घरीच फेस मास्क, फेस पॅक म्हणजेच बेसन आणि हळदीचा फेस पॅक, दूध आणि बेसनाचा फेस पॅक, डाळींचे फेस पॅक इत्यादी प्रकारचे फेस पॅक वापरू शकता. हे तुमचे नुकसान करणार नाही आणि तुम्हाला त्याच्या वापरासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.