Download App

‘दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा’; संभाजी भिडे यांचं आणखी एक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

सांगलीत बोलताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दांडियावर एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.

  • Written By: Last Updated:

Sambhaji Bhide Controversial Statement On Dandiya : सांगलीत नुकताच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दांडियावर एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) नेहमीच आपल्या भाषणांमुळे चर्चेत राहतात. यावेळी ते थेट भारतीय संविधानावर उद्विग्न टीका करताना दिसले. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी भारत आणि समाजाबाबत तीव्र टीका (Dandiya) केली. त्यांनी म्हटले की, “जगात 187 देश आहेत, पण आपली लायकी तर आपल्या संविधानातच आहे. विद्वान लोक संविधानाची खूप स्तुती करतात, पण वास्तविकता वेगळी आहे.

संभाजी भिडेंनी म्हटलंय की, भारत हा देश 1300 वर्षे मुस्लिम आणि युरोपियनांच्या वर्चस्वाखाली राहिला आहे. ज्यांना या काळातील गुलामीची लाज नाही, त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे.

पुन्हा एकदा वादग्रस्त परिस्थिती

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत पुढे म्हटले, “शिवाजी महाराजांनी पंधराव्या वर्षीच नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली. आम्हालाही फक्त स्वराज्य नको, तर हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे. भिडेंनी नवरात्र उत्सवात होणाऱ्या दांडियाबाबतही टीका केली. गणपती आणि नवरात्रात दांडिया खेळून सणांचा खरा अर्थ हरवला आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे, असे ते म्हणाले.

‘दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा?’

संभाजी भिडेंच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, संविधान आणि दांडिया खेळावरील त्यांचे वक्तव्य सामाजिक तसेच राजकीय स्तरावर टीकेला सामोरे जाऊ शकते.

आपण गणपती व नवरात्र उत्सव (Navratri) साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे. – संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक

follow us