अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं रिलीज; नवरात्रीसाठी चाहत्यांना खास सरप्राईज

अभिजीत सावंत आता गुजराती गाण्याचा माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

Abhijeet Sawant First Gujarati Song

Abhijeet Sawant First Gujarati Song For Navratri : इंडियन आयडॉल ते आज गायन विश्वात 20 वर्ष पूर्ण करत असताना गायक अभिजीत सावंत अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसतोय. इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिजीत सावंत आता गुजराती गाण्याचा माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

अभिजीतच्या आवाजाची जादू

नवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीतने (Abhijeet Sawant) गायलेलं पहिलं वहिल गुजराती मराठी (Gujarati Song) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रेमरंग सनेडो, असं या गाण्याचं नाव (Premrang Sanedo) असून आता गुजराती प्रेक्षकांना देखील अभिजीतच्या आवाजाची जादू (Navratri) अनुभवयाला मिळणार आहे.

गरब्याचं गाणं करताना

या नव्या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सांगतो, एखादं छान गुजराती फेस्टिवल गाणं करण्याची माझी आधीपासून इच्छा होती. प्रेमरंग सनेडोसारखं गरब्याचं गाणं करताना एक छान अनुभव मिळाला. सोबतीला नव्या भाषेत प्रयोग करण्याची संधी मिळाली. गुजराती गाण्याला थोडा आपला मराठमोळा ठसका देऊन या गाण्याची रचना केली असून दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र घेऊन हे गाणं शब्दबध्द करण्यात वेगळीच गंमत होती. ती या निमित्ताने अनुभवली.

अभिजीतने आजवर अनेक सदाबहार गाण्यानी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता तो गुजराती प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे.

follow us